Pune Theft Arrest Case: पुण्यात बांगलादेशी चोराला अटक; 6.7 लाखांचे कॅमेरे जप्त

अनेक राज्यांमध्ये 50 हून अधिक गुन्हे; परदेशी चलन आणि पासपोर्टही सापडले
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

पुणे: कर्वेनगरमधील एका फोटोग््रााफी स्टुडिओची खिडकी तोडून तब्बल पावणेसात लाखांचे महागडे कॅमेरे आणि ड्रोन चोरी करणाऱ्या एका बांगलादेशी गुन्हेगाराचा छडा लावण्यात अलंकार पोलिसांना यश आले आहे. त्याला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर आंध प्रदेश, तेलंगणा राज्यासह देशाच्या विविध भागांत 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Arrested
Pune University Recruitment: पुणे विद्यापीठात 111 प्राध्यापकांची भरती; दर्जा सुधारण्याचा प्रयत्न

आरोपी बनावट नावाने देशात वावरत होता. त्याच्याकडे चोरीच्या मालासह अनेक देशांचे परदेशी चलन आणि बांगलादेशी पासपोर्ट मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय 38, रा. ढाका, बांग्ालादेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 38 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Arrested
Pune University Forensic Audit: पुणे विद्यापीठात फॉरेन्सिक ऑडिटवरून वाद; प्रशासनाला जाब

कर्वेनगर येथील ‌‘द टेरिटरी‌’ या ऑफिसमधून 14 मार्च रोजी रात्री चोरट्याने खिडकीचा गज तोडून कॅमेरा, महागड्या लेन्स, ड्रोन आणि आयफोन असा एकूण 6 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक संशयित इसम रॉयल एनफिल्ड ‌‘हिमालयन‌’ बुलेटवरून जाताना दिसला. तांत्रिक विश्लेषणानुसार, हा आरोपी पुण्यातून पसार होऊन हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर आणि मिर्झापूरमार्गे उत्तर प्रदेशात गेल्याचे स्पष्ट झाले.

Arrested
Pune Police Recruitment Death: पोलीस भरतीदरम्यान १६०० मीटर धावण्यात तरुणाचा मृत्यू

अखेर वाराणसी पोलिसांच्या मदतीने त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपी नेवानाथ विनोद कुमार, असे सांगून खोट्या ओळखपत्रांच्या आधारे वावरत असल्याचे समोर आले. त्याच्या अंगझडतीत बांग्ालादेशी पासपोर्टसह अमेरिकन डॉलर, चिनी, मलेशियन, सिंगापूर, कॅनेडियन आणि नेपाळी चलन जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध आंध प्रदेश आणि तेलंगणामध्ये तब्बल 36 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 29 गुन्ह्यांत तो यापूर्वी अटकेत होता, तर 6 गुन्ह्यांत पोलिस त्याचा शोध घेत होते. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, जगन्नाथ भोसले, जगदीश तळोले, निशिकांत सावंत, धीरज पवार, सोमेश्वर यादव, राजेश शेळके यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Arrested
Pune Water Supply Decision: पाणीपुरवठ्यासाठी व्हॉल्वमनला प्रमाणपत्र बंधनकारक

दहशतवादी कनेक्शनचा संशय?

आरोपीकडे परदेशी चलन आणि बांगलादेशी पासपोर्ट सापडल्यामुळे त्याचा केवळ चोऱ्यांशी संबंध आहे की तो एखाद्या दहशतवादी कारवायांत सामील आहे, यादृष्टीने पोलिस आता सखोल तपास करीत आहेत. वाराणसीतील रामनगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि ‌‘फॉरेनर्स ॲक्ट‌’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news