Pune Spa Raid: पुण्यातील बाणेरमधील स्पावर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका

स्पा व्यवस्थापक, मालक आणि जागा मालकावर गुन्हा दाखल; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई
prostitution racket crime case
prostitution racket crime casePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील हायप्रोफाइल समजल्या जाणार्‍या बाणेर परिसरातील एका स्पा सेंटरवर बाणेर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पा'चा व्यवस्थापक, मालक आणि जागा मालक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्पामधून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

prostitution racket crime case
Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी गावठी दारू विक्रीचा पर्दाफाश; वारजे माळवाडीत २०० लिटर दारूसह तिघांवर गुन्हा

स्पा व्यवस्थापक महेश अशोक ठाकरे (वय ३८, रा. पिंपळे सौदागर), स्पाचे मालक दीपक कृष्णा वाल्हे आणि जागा मालक गुरुराज भोसले यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई बाणेर-पाषाण लिंक रोडवरील गुडलक कॅफेच्या वर असलेल्या 'ग्रीनलिफ स्पा'मध्ये करण्यात आली.

prostitution racket crime case
Maharashtra Teacher Workload Protest: शिक्षकांवर पुन्हा अशैक्षणिक कामांचा भार; शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला संघटनांचा विरोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. स्पाच्या आडून हा व्यवसाय चालवून त्यातून मिळणार्‍या पैशांवर उपजीविका केली जात होती. त्यानूसार सोमवारी रात्री उशिरा पथकाने संबंधीत ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

prostitution racket crime case
Pune Municipal Corporation Court Cases: पुणे महापालिकेतील न्यायालयीन खटल्यांना विलंब; सात महिन्यांनंतरही नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती रखडली

येथून पथकाने तीन पीडित महिलांची सुटका केली. शहरातील बाणेर भाग हा हायप्रोफाइल परिसर म्हणून ओळखला जातो. त्याठिकाणी असे प्रकार उघडकीस येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास बाणेर पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news