Pune Newlywed Death: बाणेरमध्ये नवविवाहितेची आत्महत्या; हुंड्याच्या छळाचा आरोप

लग्नानंतर तीन महिन्यांत टोकाचे पाऊल; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Married Women Suicide
Married Women SuicidePudhari
Published on
Updated on

पुणे: मागील वर्षी घडलेले वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच विद्यानगरी समजल्या जाणाऱ्या पुण्यात नवविवाहितेने सासरकडून होणाऱ्या मागण्या अन्‌‍ जाचाला कंटाळून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्का दायक घटना 19 फेबुवारीला बाणेर परिसरात घडली. लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यांत हा प्रकार घडला. याप्रकरणी तिच्या वडिलांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Married Women Suicide
PMRDA Growth Centers: पीएमआरडीए हद्दीत आणखी 74 गावांचे नियोजन एमएसआरडीसीकडे?

गंगा तेजस बेंबळकर (वय 27, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. पती तेजस शिवा बेंबळकर (वय 31), उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय 58), शिवा माणिकराव बेंबळकर (वय 62), रिया शिवा बेंबळकर (वय 33, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय 59, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Married Women Suicide
Mundhwa Kalbhairavnath Kushti Akhada: मुंढव्यात क्षेत्रपाल कालभैरवनाथ उत्सवानिमित्त 52 कुस्त्या निकाली

तक्रारदार शरणकुमार माशाळ हे प्राध्यापक असून, 13 नोव्हेंबरला त्यांनी मुलीचे लग्न लावले होते. मुलगी गंगा आणि तेजस यांचे लग्न झाल्यानंतर ते बाणेरमध्ये राहत होते. आरोपी तेजसचे अमेरिकेत उच्चशिक्षण झाले असून, तो पुण्यात आयटी इंजिनीअर आहे. गंगा ही सुंदर तसेच उच्चशिक्षित असून, आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे. तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला लग्नात काही नको, असे बोलून बेंबळकर कुटुंबीयांनी जून 2025 मध्ये साखरपुडा केला.

Married Women Suicide
Pune Holi Tree Cutting: होळीसाठी वृक्षतोड केल्यास एक लाखांचा दंड; पुणे महापालिकेचा कडक इशारा

गंगाच्या वडिलांनी मानपान केल्यानंतरही तेजशची आईने पाहुण्यांमध्ये आमची इज्जत काढून असला भिकारी फालतू आहेर आणला आहे का, आम्ही तुम्हाला भिकारी दिसत आहोत का, आमचे कुटुंब हे प्रतिष्ठित असून, आमचे पाहुणे हे उच्च वर्गातील आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही असला आहेर आणला का, असे म्हणत तक्रारदारांच्या कुटुंबाचा अपमान केला.

Married Women Suicide
Kharadi Cyber Fraud: डिस्काउंट शेअर्सच्या आमिषाला बळी; खराडीत ज्येष्ठाची 1.49 कोटींची सायबर फसवणूक

लग्नातही आरोपी तेजसने घातला होता राडा

चांगल्या कंपनीची अंडरवेअर व बनियन आणले नाही, म्हणून तेजस लग्नामध्ये मुहूर्तावर आला नाही. लग्नानंतर आठवडाभराने धार्मिक विधीसाठी मुलगी व जावई कलबुर्गीला आले. तेव्हा गंगाने तिला सासरचा जाच असल्याचे सांगितले. तुझ्या माहेरून 21 तोळे सोने घेऊन ये, अशी मागणी करत आहे, अशी माहिती वडिलांना दिली. त्यानंतरही त्यांनी मुलीला समजावून सासरी पाठवले होते. त्यानंतर सोलापूरमध्ये लग्नाला 5 फेबुवारीला गंगा तिच्या वडिलांना भेटली. तेव्हा तिने आपल्याला हुंड्यावरून त्रास देत असल्याचे सांगितले. त्यांनी आम्ही पुढील महिन्यात येऊन भेटतो, असे सांगितले होते. मात्र, तत्पूर्वीच तिने 19 फेबुवारीला आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news