Aundh Property Extortion: ‘जागा हवी असेल तर २ कोटी द्या’; औंधमध्ये लिव्ह अँड लायसन्स संपूनही इमारतीवर ताबा, पेटवून देण्याची धमकी

भाडे न भरता मालमत्तेवर बेकायदा ताबा ठेवल्याचा आरोप; व्यावसायिकाच्या तक्रारीवर दोघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा
Extortion News
Extortion NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: लिव्ह अँड लायसन्स करार संपल्यानंतरही इमारतीचा ताबा न सोडता, 'जागा परत हवी असेल तर दोन कोटी रुपये द्या, नाहीतर मालमत्ता विसरून जा. गरज पडली तर इमारतही पेटवून देऊ,' अशी थेट धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार औंधमध्ये उघडकीस आला आहे.

Extortion News
Pune Home Renovation Consumer Court: साडेतीन वर्षे रखडले घराचे नूतनीकरण; ग्राहक आयोगाचा बांधकाम व्यावसायिकाला दणका

याप्रकरणी दोघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सत्यप्रकाश शंभू पोद्दार (वय ४७, रा. सूस) आणि प्रदीप शंभू पोद्दार (वय ४२) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत व्यावसायिक महेंद्र संपतराव गोडगे (वय ४९, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सेनापती बापट रोडवरील सनराईज अपार्टमेंटमध्ये घडला आहे.

Extortion News
Pune Firing Incidents: पुणे बनतेय ‘ट्रिगर सिटी’! सात महिन्यांत ३० हून अधिक गोळीबार; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोडगे यांनी औंधमधील रिट्रीट परिसरातील हॅपिलेस्ट अपार्टमेंटमधील इमारत आरोपी सत्यप्रकाश शंभू पोद्दार याला लिव्ह अँड लायसन्स कराराने वापरण्यास दिली होती. ३० जून २०२१ पर्यंत कराराची मुदत होती. कराराची मुदत संपूनही आरोपीने इमारत रिकामी केली नाही.

Extortion News
Pune News : राजगुरुनगर बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा ‘गायब’, जिल्हा निबंधकांच्या कार्यालयात ‘तडजोडी’ची चालढकल?

उलट अनेक महिन्यांपासून भाडेही न भरता इमारतीवर बेकायदेशीर ताबा कायम ठेवल्याचा आरोप आहे. याचदरम्यान आरोपीचा भाऊ प्रदीप पोद्दार हा फिर्यादीच्या कार्यालयात पोहचला. त्या वेळी त्याने 'इमारत परत देणार नाही, इमारत परत हवी असेल तर सेटलमेंट करा,' असे म्हटले. त्याने आपल्या भावाला फोन लावून दिला. त्याने फिर्यादींना फोनवरून दोन कोटी रुपये द्या, नाहीतर मालमत्ता विसरून जा. इमारत आम्ही सोडणार नाही. काय करायचे ते करा. आमचे अनेक गुन्हेगार टोळ्यांशी संबंध आहेत. गरज पडली तर मालमत्ता पेटवून देऊ,' अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Extortion News
Daund Police Action: दौंड शहरात मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; सात गुन्हे दाखल

एवढ्यावरच न थांबता दोन कोटी रुपयांची मागणी मान्य केली नाही, तर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप आहे. या धमक्यांमुळे घाबरलेल्या फिर्यादीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news