Daund Police Action: दौंड शहरात मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; सात गुन्हे दाखल

तीन वाहने ताब्यात
Daund Police Action
Daund Police ActionPudhari
Published on
Updated on

दौंड: दौंड शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये सात गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. ६) सायंकाळी सुमारे ७ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दौंड शहरातील भाजी मंडई, गांधी चौक परिसर, दौंड पोस्ट ऑफिस रोड तसेच नगर दौंड बायपास फाट्याजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली.

Daund Police Action
Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

या कारवाईदरम्यान महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ तसेच मुंबई पोलीस कायद्यातील संबंधित कलमान्वये चार गुन्हे, तर मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अन्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सोन हरीस, राजविरसिंग समुदसिंग, खलील गोपाळ माळी, तुती रा. पाटील, जित विक्र दायमा, नेने चाळ, प्रतिक छगन सोनवणे, रोहन मतीश सोनवणे, दिलीप सखाराम कांबळे, अभिजित जाली पगनी, अशिष अंबादास फडसे, अक्षय अंबादास फडसे, अंकुश बाबू शिंदे, चंद्रकांत गणेश हिरणावळे, विक्की यल्लाप्पा शिंदे आणि अक्षय गणेश तुपसौद्रेय यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Daund Police Action
Water Quality Report: हवेली, शिरूर तालुक्‍यातील पाणी पिण्यास, शेतीसाठी अयोग्य!

कारवाईदरम्यान ॲक्टिव्हा (एमएच ४२ बीव्ही ४४१) आणि lएचएफ डिलक्स (एमएच ४२ एवाय८४५४) अशी तीन वाहने ताब्यात घेण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणे, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणे यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दौंड पोलिसांनी दिला आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी दौंड पोलीस ठाण्याशी संपर्क करावा.

- हेमंत शेंडगे, पोलीस निरीक्षक, दौंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news