Pune Market Groundnut Prices: आवक घटल्याने शेंगदाण्याचे दर विक्रमी पातळीवर

पुणे भुसार बाजारात तुटवड्याचा फटका; शेंगदाणा तेलाच्या दरातही मोठी वाढ
Groundnut
GroundnutPudhari
Published on
Updated on

सुभाष किवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारात आवक कमी असल्यामुळे सर्व प्रकारच्या शेंगदाण्याच्या दरात प्रचंड वाढ झाली असून, दराने विक्रमी पातळी गाठली आहे. यामुळे शेंगदाणा तेलाच्या दरातही डब्यामागे दोनशे रुपयांनी वाढ झाली. येथील घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे आणखी पन्नास रुपयांनी वाढ झाली.

Groundnut
Pune Orange Market Prices: आवक वाढल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात संत्रीचे दर २० टक्क्यांनी घसरले

गुजरातमध्ये भुईमूग शेंगाचे पीक कमी आल्याने शेंगदाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. यामुळे दर मोठया प्रमाणात वाढत आहेत. गेल्या आठवडयातही येथील घाऊक बाजारात तीव्र तुटवडयामुळे सर्वच शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे एक ते दोन हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. भारी प्रतीच्या जाडा शेंगदाण्याचा घाऊक बाजारातील दर आता प्रतीक्विंटल पंधरा हजार रुपयांवर पोहोचला असून हा दर ऐतिहासिक मानण्यात येत आहे. हलक्या प्रतीच्या टीजे शेंगदाण्याच्या दरातही मोठी वाढ झाली असून प्रतिक्विंटलचा दर 11 हजार 500 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. हंगाम काळातच दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. ही दरवाढ रोखण्याकरिता वेळीच पावले उचलली नाहीत तर दर आणखी कडाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Groundnut
Pune Fish Market Prices: थंडीचा फटका; गणेश पेठेत मासळीचे दर १० टक्क्यांनी वाढले

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:

साखर (प्रतिक्विंटल) 4000-4050 रु.

खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2800-2900, रिफाईंड तेल 2300-3100, सरकी तेल 2030-2400, सोयाबीन तेल 2030-2300, पामतेल 1950-2250, सूर्यफूल रिफाईंड तेल 2280-2400, खोबरेल तेल 4800, वनस्पती 1900-2300 रु.

तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 12500-14000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु.

गहू:- लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-4050, नं.3 3350-3650, सिहोर नं. 1 5700- 6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 3250-3300 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु.

गूळ:- गूळ एक्ष्ट्रा 4600-4700, गूळ नं. 1 4350-4550, गूळ नं.2 4050-4200 गूळ नं.3 3850-4000, नं. 4 - 3650-3800, बॉक्स 4000-5000 रु.

डाळी:- तूरडाळ 10000-13500, हरभराडाळ 7000-7200, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7300- 7400, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 10000-13000 रु.

कडधान्ये:- हरभरा 6200-6500, हुलगा 4500-5000 चवळी 7000-9500, मसूर 6600-6700, मूग 9000- 9500, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 15000-16000, वाटाणा हिरवा 8000-9000, वाटाणा पांढरा 4500-4700, काबुली चणा 7500-11000 रु.

Groundnut
Pune Market Yard Vegetable Prices: आवक वाढल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात भाजीपाल्याचे दर घसरले

साबुदाणा :- साबुदाणा नं.1 5000, साबुदाणा नं.2 4750, साबुदाणा नं.3 4500 रु. वरई भगर :-9500-10500, सावा भगर 9000-9500 रु. गोटा खोबरे 3100-3400 रु. शेंगदाणा :- जाडा 11500-12500, स्पॅनिश15000, घुंगरु 15000 टीजे 115000 रु.

धने:- गावरान 9000-11000, इंदूर 13000-15000 रु.

पोहे:- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पांहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 5500-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु.

रवा, मैदा, आटा:- (50 किलोचा भाव) आटा 1750-1850, रवा 1800-1850, मैदा 1800-1850, बेसन:- (50 किलोस) 4150-4450 रु.

मीठ:- मीठ खडे (50किलोस) 300, मीठ दळलेले (50 किलोस) 350 रु.

मिरची:- काश्मीरी ढब्बी 35000-40000, ब्याडगी 25000-28000, लवंगी तेजा 17000-18000, गुंटूर 17000-18000, खुडवा गुंटूर 8000-11000, खुडवा ब्याडगी 10000-12000 रु.

नारळ:- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 2100-2300, मद्रास 4500-5000, पालकोल जुना 2500-2600, सापसोल 4500-5200 रु.

Groundnut
Pune Crime : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दोन चिमुरड्यांसह संपवले जीवन

साखरेचा कोटा जाहीर

थंडी कमी होऊन उन्हाचा चटका जाणवू लागल्याने शीतपेय आणि आईसक्रिम उत्पादकांकडून साखरेस मागणी वाढत आहे. यामुळे साखरेचीही दरवाढ सुरु आहे. गेल्या आठवडयातही दरात क्विंटलमागे आणखी पंचवीस ते पन्नास रुपयांनी वाढ झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 4 हजार ते 4 हजार 50 रुपये होता. आवक जावक सम प्रमाणात असल्यामुळे सर्व प्रकारच्या गुळाचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मागणी वाढल्यामुळे सेलम मटकीचे दरही क्विंटलमागे आणखी पाचशे ते एक हजार रुपयांनी वाढले. हरभराडाळीच्या दरवाढीमुळे बेसन दरात 50 किलोच्या पोत्यामागे 50 रुपयांनी वाढ झाली.

शेंगदाणा तेलाचीही दरवाढ

शेंगदाण्याच्या दरातील प्रचंड वाढ आणि तुटवडयामुळे शेंगदाणा तेलाच्या दरातही मोठी वाढ झाली. गेल्या आठवडयाभरातच शेंगदाणा आणि रिफाईंड तेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे सुमारे दोनशे रुपयांनी वाढ झाली. उंच दरात मागणी कमी झाल्याने अन्य खाद्यतेलांची दरवाढ तूर्ततरी थांबल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारातही गेल्या आठवडयात सोयाबीन, पाम तसेच सुर्यफूल तेलाची दरवाढ थांबली होती, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news