Pune Andekar Gang Case: पुण्यात आंदेकर टोळीचा हल्ला प्रकरण; सीसीटीव्हीतून धक्कादायक खुलासे

वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्यात टोळीच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या असून पोलिस तपासाला वेग आला
CCTV Camera
CCTV CameraPudhari
Published on
Updated on

पुणे: वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर बालाजीनगर येथे कोयत्याने हल्ला आणि गोळीबार केल्यानंतर पसार झालेल्या आंदेकर टोळीतील पाच आरोपींनी एका कपड्यांच्या दुकानात जाऊन नवीन कपडे खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. कपडे बदलताना आरोपींमध्ये झालेली चर्चा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली असून, त्याआधारे पोलिस तपास करत आहेत. नवीन कपड्यांचे बिल देणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरू असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी न्यायालयाला दिली.

CCTV Camera
Pune School Bus Fare Hike: पुण्यात स्कूल बस भाडे 15 ते 20% वाढण्याची शक्यता; डिझेल दरवाढीचा फटका

या प्रकरणात अटक केलेल्या अमन उर्फ लाला बागवाले, वेदांत टेमगिरे, आवेज शेख, ऋषिप्रसाद आंबट आणि आफताब सय्यद यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी (दि. 27) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हल्ला केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी आरोपी एका दुकानात गेले होते. या दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण व त्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या आरोपींच्या आवाजाचे विश्लेषण सुरू आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी आणि दुकानात आरोपी आवेज शेख हा मोबाईलवर बोलताना दिसून आला. तो मोबईल जप्त करायचा आहे. आरोपींनी समाजमाध्यमांवरून संपर्क साधल्याचेही समोर आले आहे.

CCTV Camera
Pune Overhead Cable Issue: पुण्यात लटकत्या ओव्हरहेड केबल्सचा धोका कायम; धोरण अंमलबजावणीला विलंब

तसेच हल्ल्यापूर्वी त्यांनी अक्षय म्हस्केवर पाळत ठेवल्याचा संशय आहे. ते गुन्हा करण्यापूर्वी कुठे जमले होते आणि कसे पळाले, या अनुषंगाने गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना करायची आहे. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली विनाक्रमांकाची दुचाकी कोणाकडून आणली होती, याचा तपास करायचा असून, तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत तपास अधिकारी निरीक्षक संतोष जाधव आणि सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी कोठडी वाढविण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.

CCTV Camera
Pune FC Road Encroachment: एफसी रस्त्यावर अतिक्रमण कायम; महापालिका कारवाई केवळ घोषणांपुरती?

ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावर बालाजीनगर येथील राजर्षी शाहू बँक चौकात घडली. आरोपींच्या हल्ल्यात अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय 26, रा. आंबेगाव पठार) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणात पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपींसह आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमित बहादूरकर आणि स्वप्नील बहादूरकर यांच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एका अल्पवयीन मुलाला बालनिरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

CCTV Camera
Pune Drain Cleaning Delay: पुण्यात नालेसफाई रखडली; पहिल्याच पावसात शहर तुंबण्याची भीती

पुढील टार्गेट कोण?

वनराज आंदेकर खून प्रकरणातील अटक आरोपींच्या नातेवाईकांना आंदेकर टोळी लक्ष्य करत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. टोळीचे पुढील लक्ष्य कोण असू शकते, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news