

पुणे: महापालिकेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी कॉंग््रेास अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग््रेास शरद पवार यांनी आघाडी केली असली तरी 8 जागांवर दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. तर दुसरीकडे कॉंग््रेास, शिवसेना उद्धव ठाकरे गट व मनसे यांनी देखील आघाडी केली असली तरी एबी फॉर्म देतांना त्यांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. 20 प्रभागात 12 जागांवर काँग््रेास शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उमेदवार समोरासमोर आहेत तर तब्बल 7 जागांवर कॉंग््रेास मनसे, 3 जागांवर मनसे शिवसेना उद्धव ठाकरे आणि 3 जागांवर काँग््रेास मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उमेदवार समोरासमोर उभे असून, गुरुवारी मतदानाला सामोरे जाते आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असल्याचे या पक्षांनी जाहीर केल्याने या लढती मैत्रीपूर्ण म्हणायच्या का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आघाड्यांचे चित्र कागदावर स्पष्ट दिसत असले तरी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात मात्र मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग््रेास आणि राष्ट्रवादी कॉंग््रेास (शरद पवार गट) यांनी महापालिका निवडणुकीसाठी आघाडी जाहीर केली असली तरी तब्बल आठ जागांवर दोन्ही गटांचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर येत असून, मतदारांतही संभम निर्माण झाला आहे. ‘एकत्र आघाडी’ असा संदेश देणाऱ्या या पक्षांना प्रत्यक्षात मात्र अनेक प्रभागांमध्ये थेट संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.
दुसरीकडे कॉंग््रेास, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांनी देखील निवडणुकीपूर्वी आघाडीची घोषणा केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्म देताना या आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय साधला न गेल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, अनेक प्रभागांमध्ये हे मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. 20 प्रभागांतील 12 जागांवर कॉंग््रेास आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे उमेदवार थेट समोरासमोर आहेत. तसेच सात जागांवर कॉंग््रेास आणि मनसे यांच्यात लढत होत आहे. याशिवाय तीन जागांवर मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे उमेदवार आमनेसामने असून, आणखी तीन जागांवर कॉंग््रेास, मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तिन्ही पक्षांचे उमेदवार एकाच प्रभागात रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये ब जागेवर कॉंग््रेास मनसे समोरासमोर लढत आहेत. तर क जागेवर कॉंग््रेास मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत लढत होत आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील अ, ब, क जागेवर देखील कॉंग््रेास मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार समोरासमोर आहेत. तर ड जागेवर मनसे- कॉंग््रेासचे उमेदवार समोरासमोर आहेत. प्रभाग क्रमांक सात मध्ये अ, क, ड जागेवर कॉंग््रेास मनसे सामोरासमोर आहे. प्रभाग क्रमांक 9 च्या अ जागेवर दोन्ही राष्ट्रवादी तर ड जागेवर कॉंग््रेास मनसे समोरासमोर लढत आहेत. प्रभाग 11 क आणि ड जागेवर कॉंग््रेास मनसे, प्रभाग 15 मध्ये अ आणि ब जागेवर कॉंग््रेास मनसे तर क जागेवर कॉंग््रेास मनसे लढत होत आहे. प्रभाग 19 च्या ब आणि ड जागेवर कॉंग््रेास उद्धव ठाकरे गट तर प्रभाग 21 ड जागेवर कॉंग््रेास मनसे सामोरासमोर आहे. ही परिस्थिती प्रभाग 22 च्या अ आणि ड जागेवर आहे. येथे देखील कॉंग््रेास मनसे समोरासमोर आहेत. प्रभाग 23 मध्ये ड जागेवर उबाठा मनसे, प्रभाग क्रमांक 24 क जागेवर कॉंग््रेास उद्धव ठाकरे, प्रभाग 27 क आणि ड जागेवर दोन्ही राष्ट्रवादी, प्रभाग 27 मध्ये अ व ड जागेवर दोन्ही राष्ट्रवादी तर क जागेवर दोन्ही राष्ट्रवादी आणि उबाठा आणि मनसे लढत होत आहे. प्रभाग क्रमांक 30 क मध्ये दोन्ही राष्ट्रवादी, प्रभाग 26 अ मध्ये कॉंग््रेास उद्धव ठाकरे गट, ब, क, ड जागेवर दोन्ही राष्ट्रवादी तर ड जागेवर कॉंग््रेास मनसेचे उमेदवार समोर आहेत. प्रभाग 33 ड प्रभाग 36 ड जागेवर कॉंग््रेास व उद्धव ठाकरे गट, प्रभाग 37 ड जागेवर मनसे उद्धव ठाकरे गट, प्रभाग 38 क आणि ड जागेवर कॉंग््रेास उद्धव ठाकरे तर प्रभाग 40 च्या अ, क, ड जागेवर देखील कॉंग््रेास उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सामोरासमोर उभे आहेत.
या सर्व लढतींबाबत संबंधित पक्षांकडून ‘मैत्रीपूर्ण लढत’ असल्याचे जाहीर केले जात असले तरी प्रत्यक्ष प्रचारात मात्र आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन आणि मतांसाठीची चुरस स्पष्टपणे दिसून आली आहे. त्यामुळे या लढती खरोखरच मैत्रीपूर्ण म्हणायच्या का, की त्या आघाड्यांतील विसंवादाचे द्योतक आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
अंतर्गत लढतींचा फटका कोणाला बसणार?
गुरुवारी मतदान होत असताना या अंतर्गत लढतींचा नेमका फटका कोणाला बसतो आणि त्याचा अंतिम निकालावर किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतांचे विभाजन होऊन विरोधकांना अप्रत्यक्ष फायदा होतो की मतदार ‘पक्षापेक्षा उमेदवार’ या भूमिकेतून मतदान करतात, याचे उत्तर निकालातूनच मिळणार आहे.