Pune Airport Road Widening: पुणे विमानतळ रस्ता होणार कोंडीमुक्त; 24 मीटर रुंदीकरणाला वेग

सीएसआर निधीतून नागपूर चाळ ते विमानतळ प्रवेशद्वारापर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रशस्त रस्ता; पुण्याच्या वारशाचे दर्शन घडवणारे सुशोभीकरण
Airport Road Widening
Airport Road WideningPudhari
Published on
Updated on

पुणे: हवाई मार्गाने पुण्यात येणाऱ्या पर्यटक-प्रवाशांना लवकरच जाता-येताना उत्तम दर्जाचा प्रशस्त रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यांना पुण्याच्या समृद्ध वारसा, कला, परंपरा, संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे. यासाठी नागपूर चाळ ते विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता सध्याच्या 12 मीटरवरून 24 मीटर रुंद केला जाणार असून, त्याला सुशोभीकरणाची जोड दिली जाईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) विकसित होणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Airport Road Widening
Pune Prisoners Mental Health: पुण्यातील 81 टक्के कैद्यांशी कुटुंबीयांचा संपर्क तुटला; मानसिकतेवर गंभीर परिणाम

लोहगाव येथे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 200- 225 उड्डाणे होतात, तर वार्षिक प्रवासीसंख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. मात्र, प्रवाशांची आणि वाहनांची वर्दळ वाढल्याने विमानतळ रस्त्यावर बाराही महिने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक होते. यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुशोभीकरणाची संकल्पना मोहोळ यांनी स्वतः मांडत यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विमानतळ संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे ग््रुाप कॅप्टन कुलदीप सिंग यांच्यासमवेत बैठक घेतली होती. त्यात रुंदीकरण आणि सुशोभीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.

Airport Road Widening
Sahyadri Hospital: हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलची नागरिकांकडून तोडफोड; रुग्णावर व्यवस्थित उपचार न केल्याने संताप

नागपूर चाळ ते विमानतळापर्यंत रस्ता हवाई दलाचा आणि खासगी मालकीचा आहे. हवाई दलाकडून जागा ताब्यात येत नसल्याने रस्त्याचे रुंदीकरण दीर्घकाळ रखडले होते. मात्र, मोहोळ यांनी हा प्रश्न सोडवला असल्याने रुंदीकरण आणि सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हवाई दलाने नागपूर चाळीपासून विमानतळपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी मंजुरी दिली असून, खासगी जागामालकांनी भूसंपादनाला मान्यता दिली. त्यामुळे नागपूर चाळ ते लोहगाव विमानतळपर्यंत 3 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Airport Road Widening
Mundhwa Land Deal : अजित पवारांचा २०१८ पासून मुंढवातील 'त्या' जमिनीवर नजर : अंजली दमानियांचे गंभीर आरोप

रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारणार रस्ता रस्त्याची वैशिष्ट्ये नागपूर चाळ ते विमानतळ रस्ता 12 मीटरवरून 24 मीटर रुंद होणार जागतिक दर्जाचा रस्ता विकसित केला जाणार पादचारी मार्ग, शोभिवंत झाडे, कारंजी, विद्युत रोषणाई प्रवासी व नागरिकांसाठी आकर्षक फर्निचर चित्र व शिल्पांद्वारे उलडगणार पुण्याचा गौरवशाली वारसा, कला, संस्कृती, परंपरेचेही घडणार दर्शन.

Airport Road Widening
PMC Election: ‘फार घमेंडीत राहू नका… तुमचा खूपचंद होईल!’ — पुणे पालिकेतील न. चिं. केळकरांच्या गाजलेल्या निवडणूक गमतीजमती

विमानतळावरून पुण्यात येताना आणि जाताना दिसणारे चित्र पाहून प्रवाशांच्या मनात पुण्याचे पहिले आणि शेवटचे प्रतिबिंब उमटते. पुण्यात येताना त्यांना प्रसन्नतेचा अनुभव यावा, शहराची ओळख व्हावी आणि जाताना शहराचा समृद्ध वारसा, संस्कृती, परंपरा, सोयीसुविधा यांचा ठसा त्यांच्या मनावर कायमस्वरूपी उमटावा, यादृष्टीने हा रस्ता विकसित केला जात आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. हा रस्ता पुण्याची नवी ओळख बनेल.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news