

पुणेः लोहागाव विमानतळावर प्रवाशांना बिबट्या वारंवार दिसत आहे.रविवारी देखील दिसला, मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे बिबट्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत प्रवाशांनी बोलून दाखवली.0
यावर्षी शहरातील विमानतळावर बिबट्या गत तीन ते चार महिन्यांपासून दिसत आहे. वनअधिकारी वारंवार येतात. मात्र तो काही हाती लागत नाही. त्यांनी आठ कॅमेरा अन् तीन सापळे त्या भागात लावले आहेत. मात्र त्यात बिबट्या अडकत नाही. रविवारी पुन्हा एकदा दिसला. मात्र इंडिगो एअरलाइन्सच्या सध्याच्या गोंधळामुळे बिबट शोध मोहीम थंडावली आहे.
- प्रथमच २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता बिबट्या विमानतळावर दिसला.
- नंतर त्याच दिवशी रात्री ८ वाजता विमानतळावर बिबट्याला दोनदा पाहिले गेले.
-त्यानंतर, ऑगस्टच्या मध्यापर्यंत तो अनेक वेळा दिसला.
- नोव्हेंबरच्या अखेरीस बिबट्या आठवडाभर दिसला.
-डिसेंबरमध्ये त्याचे वारंवार दर्शन
-सध्या हवाई क्षेत्रात आणि हवेच्या परिघावर एकूण १५ कॅमेरे लावले आहेत.
-इंडिगो कंपनीच्या गोंधळामुळे गेल्या काही दिवसांत अनेक उड्डाणे रद्द केल्यामुळे हवाई क्षेत्रात आवाज आणि हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे बिबट्याचा संचार वाढला आहे.
-विशेषतः रात्री उशिरा तो वारंवार बाहेर पडत असल्याचे प्रवाशांनी पाहिले.
-वन अधिकाऱ्यांच्या मते बिबट्या तेथेच लपला आहे.
-गेल्या तीन दिवसांत तो कॅमेऱ्यांमध्ये दोनदा दिसला.
-बिबट्याला पकडण्यासाठी विमानतळावरील बोगद्यातील सापळ्याच्या पिंजऱ्यांची संख्या पाच नेणार
-रनवेपासून ५०० मीटर आणि टर्मिनलपासून ८०० मीटर अंतरावर विमानतळावर बिबट्या दिसला आहे.
यापूर्वी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की हा प्राणी खूप हुशार आहे. पिंजऱ्यात भक्ष ठेवले असूनही तो आत जात नव्हता. विमानतळ हा या पूर्ण वाढलेल्या नर बिबट्याच्या प्रदेशाचा भाग आहे आणि तो विमानतळ परिसरात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी अनेक नाल्यांचा वापर करतो. पुणे विमानतळावर इंडिगो कंपनीच्या गोंधळामुळे गेल्या चार दिवसांपासून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे बिबट्या पकडण्यासाठी ही चांगली संधी आहे.