Pune Air Pollution: पुण्यात प्रदूषणाचा विळखा! सलग तिसऱ्या दिवशी हवेची गुणवत्ता अतिखराब; श्वसनविकाराच्या रुग्णांना मास्कचा सल्ला

हवेचा गुणवत्ता निर्देशांक २२६ वर; बाणेर-बालेवाडीत प्रदूषणाची तीव्रता अधिक, वृद्ध आणि लहान मुलांनी काळजी घेण्याचे आवाहन
Air Pollution
Air PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: ‘श्वसनाचे विकार असणाऱ्या रुग्‍णांनी शहरातील हवेची गुणवत्ता सतत खराब गटात असल्‍यामुळे हवेची गुणवत्ता पाहूनच बाहेर पडावे!’ असे आवाहन हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. सलग तिसऱ्या दिवशी शहरातील हवेचा निर्देशांक अतिप्रदूषित म्हणजे २२६ मायक्रो ग्रॅम प्रतिचौरस मीटर इतका नोंदला गेला आहे.

Air Pollution
Pune Winter Temperature: पुण्यात थंडीची चाहूल; एनडीए परिसरात राज्यातील नीचांकी ११.९ अंश तापमानाची नोंद

त्यामुळे आजारी व्यक्तींसह वृद्ध आणि लहान मुलांनी मास्क घालूनच बाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे. शहरातील हवा दिवाळीपासूनच अतिप्रदूषित गटात गेली आहे. ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरावर प्रदूषणाचे लोळ तयार झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून वाहनांची वर्दळही वाढली.

Air Pollution
Ghotawade Bribery Case: सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी २० हजारांची लाच मागितली; महिला मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा

या दोन्ही प्रदूषणाचा परिणाम दररोज पुणेकरांची फुप्फुसे खराब करीत आहे. गुरुवारी शिवाजीनगर २५० तर भोसरी ४२७ इतका हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक गेला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी देखील तो सरासरी २२६ वर गेल्याने हवामान शास्त्रज्ञांनी हा इशारा दिला आहे.

Air Pollution
Hadapsar Traffic Congestion: हडपसरमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा; एक किलोमीटरसाठी अर्धा ते पाऊण तास, नागरिक त्रस्त

सूक्ष्म, अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण धोक्याच्या पातळीत

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या पृश्वी विज्ञान मंत्रालयाच्या अख्त्यारीत येणाऱ्या संस्थेतील हवामानशास्त्रज्ञांनी हा इशारा दिला आहे. शुक्रवारी शहरात अतिसूक्ष्म धूलिकण (पी.एम.२.५) चे प्रमाण १०९ मायक्रो ग्रॅम प्रति चौ.मी., तर सूक्ष्म धूलिकण (पीएम १०) चे प्रमाण १६३ इतके होते. प्रत्यक्षात हे प्रमाण ६० ते ८० इतके असायला हवे.

Air Pollution
Alandi Crime: आळंदीत नगरपालिकेसमोरील चौकात तरुणावर खंजीराने हल्ला; पूर्वीच्या भांडणाचा राग

बाणेर, बालेवाडी सर्वाधिक बाधित भाग

शहरातील बाणेर, बालेवाडी हा पश्चिम उपनगरांचा भाग वाहनांच्या अतिवर्दळीमुळे धूलिकण प्रदूषणाच्या विळख्यात आहे. तेथील हवेची गुणवत्ता अर्थात एअर क्वालिटी इंडेक्स सतत २०० च्या वर आहे.

रुग्णांनी मास्कचा वापर करा

संवेदनशील गट म्हणजे ज्यांना श्वसनाचे विकार आहेत अशा रुग्णांनी बाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडावे. गंभीर आजारी, वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.