Pune 25 TMC Water Quota: पुण्यासाठी अतिरिक्त २५ टीएमसी पाण्याची मागणी; महापौरांची जलसंपदामंत्र्यांकडे धाव

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना; मुळा-मुठा पुनरुज्जीवनासह धरणांतील गाळ काढण्याची मागणी
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शहरासाठी अतिरिक्त २५ टीएमसी पाणी कोटा मंजूर करावा, अशी मागणी महापौर मंजूषा नागपुरे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.

Pune Municipal Corporation
E Search Registration Department: ई-सर्च सेवा आठवडाभर ठप्प; मालमत्तेच्या दस्त तपासणीत वकिलांची मोठी अडचण

महापौर नागपुरे यांनी शहराच्या विविध प्रश्नांबाबत मंत्री विखे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.

Pune Municipal Corporation
Engineering CAP Round 1 Allotment: १.५७ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश; १६,६१५ जणांना पहिल्याच पसंतीचे महाविद्यालय

तसेच, मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्यस्तरीय मिशन स्थापन करणे, नदीतील गाळ काढणे, प्रदूषण नियंत्रण आणि पूरव्यवस्थापनासाठी एकात्मिक आराखडा राबविण्याची मागणीही त्यांनी केली.

Pune Municipal Corporation
Pune IT Engineer Death: पुण्यात आयटी अभियंत्याने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीशी मतभेद, घटस्फोटापर्यंत पोहोचले होते प्रकरण

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधील गाळ काढून जलसाठाक्षमता वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविणे तसेच धायरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित दोन पुलांच्या बांधकामास जलसंपदा विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने देण्याची मागणीही महापौरांनी या वेळी केली. दरम्यान, महापौरांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news