Pune IT Engineer Death: पुण्यात आयटी अभियंत्याने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीशी मतभेद, घटस्फोटापर्यंत पोहोचले होते प्रकरण

Hadapsar IT Employee Death Case: हडपसरच्या अमनोरा गोल्ड टॉवरमधील घटना; पत्नीशी मतभेद, पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
Police Investigation
Police InvestigationPudhari
Published on
Updated on

पुणे: हडपसर येथील अमनोरा गोल्ड टॉवरमध्ये कौटुंबिक वादातून ३३ वर्षीय आयटी अभियंत्याने पंधराव्या मजल्यावरील सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. हडपसर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Police Investigation
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनास पुन्हा मुदतवाढ; ९२.५ टक्के शेतकऱ्यांची संमती

राहुल वेदाभ्यास पटेल (वय ३३, मूळ रा. ओडिशा) असे आत्‍महत्‍या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो अमनोरा गोल्ड टॉवरमधील पंधराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १५०३ मध्ये भाड्याने राहत होता. संबंधित सदनिका मृणाल सोनू कुमार यांच्या मालकीची आहे. राहुल हा मूळचा ओडिशा राज्यातील सुगडा परिसरातील रहिवासी असून, पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होता.

Police Investigation
TET Exam Rule: टीईटीबाबत नवा संभ्रम! माहिती अधिकारातून २००९ नंतरच्या शिक्षकांनाच अट लागू असल्याचा दावा

वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून सातत्याने वाद सुरू होते. दोघांमधील मतभेद इतके टोकाला गेले होते, की घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोहचले होते. शनिवारी राहुलने मानसिक तणावातून पंधराव्या मजल्यावरील सदनिकेतून उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Police Investigation
Junnar Landslide Risk: जुन्नर तालुक्यातील तळमाचीवाडीत पुन्हा भूस्खलनाचा धोका; डोंगर उतारावर ८०० मीटर लांबीच्या भेगा, ग्रामस्थ भयभीत

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला तसेच या घटनेची माहिती राहुलच्या वडिलांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली असून, ते ओडिशाहून पुण्याकडे रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Police Investigation
Pune Student Safety: विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी समाजाची जबाबदारी; पालक, शिक्षक आणि प्रशासनाची एकत्रित भूमिका महत्त्वाची

...असे उघडले राहुलचे घर

मध्यरात्री अचानक मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील रहिवासी घटनास्थळी धावले. खाली पडलेल्या तरुणाची ओळख पटवल्यानंतर तो पंधराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत असल्याचे समोर आले. मात्र, फ्लॅटला डिजिटल लॉक असल्याने आत प्रवेश करणे शक्य झाले नाही. त्यानंतर पोलिसांनी राहुलच्या पत्नीशी संपर्क साधून डिजिटल लॉकचा क्रमांक मिळवला. लॉक उघडून पोलिसांनी सदनिकेत प्रवेश केला आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news