पुणे : ‘आप’च्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने वार

पुणे : ‘आप’च्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने वार

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या बाजूला दारू पीत बसलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार केला. तसेच, दगडफेक करून वाहनाची काच फोडली. ही घटना फुगेवाडी येथे शनिवारी (दि. ९) दुपारी एकच्या सुमारास घडली. यशवंत श्रीमंत कांबळे (४३, रा. जुनी सांगवी), असे जखमी झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत कांबळे हे आम आदमी पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष आहेत. पिंपरी येथे आम आदमी पार्टीचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आंदोलन संपल्यावर दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी फुगेवाडी येथे दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली.

दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने कांबळे यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यानंतर आरोपींनी दगडफेक करीत एका कारची काच फोडली. कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या प्रकरणातील आरोपी हे जखमी यशवंत कांबळे यांना ओळखत नाहीत. त्यांनी दारूच्या नशेत कांबळे यांच्यावर हल्ला चढवला आहे. यामागे राजकीय सूड वैगरे असा काही प्रकार प्रथमदर्शनी दिसून येत नाही. मात्र, तरी देखील सर्व शक्यता पडताळण्याचे काम सुरू आहे.
– भास्कर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news