नगर : महावितरण कार्यालय तोडफोडप्रकरणी नगरसेवक मनोज कोतकरला अटक | पुढारी

नगर : महावितरण कार्यालय तोडफोडप्रकरणी नगरसेवक मनोज कोतकरला अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर महापालिकेचा नगरसेवक मनोज कोतकरला अटक करण्यात आली आहे. केडगाव येथे महावितरण कार्यालयाची तोडफोड करून मनोज कोतकर फरार झाला होता. कोतवाली पोलिसांनी कोतकरला आज शिरूर (जि. पुणे) येथून अटक केली आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात विजेचा खेळखंडोबा झालेला आहे. अचानकपणे कधीही वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. नगरसेवक कोतकर याने शुक्रवारी केडगाव येथील महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

यासंदर्भात महावितरणच्या अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात कोतकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मनोज कोतकर फरार झाला होता. त्याला कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून आज अटक केली .

हेही वाचलंत का ? 

Back to top button