पुणे : पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

पुणे : पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

Published on

देऊळगाव राजे, पुढारी वृत्तसेवा : देऊळगाव राजे येथील जय मल्हार वस्ती शेजारील विहिरीमध्ये बुडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २७ मे) दुपारच्या दरम्यान घडली. मृत अल्पवीयन मुलाचे नाव अथर्व पोळ असे आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि. २७ मे) रोजी दुपारी परिसरातील मुलांना सोबत घेऊन अथर्व दिलीप पोळ हा विहिरीवर पोहायला शिकण्यासाठी गेला होता. पाण्यात पोहता यावे म्हणून त्याच्या पाठीवर ड्रम बांधला होता. ड्रमसह त्याने पाण्यात उडी मारली. त्यावेळी त्याच्या कंबरेला बांधलेला ड्रम सुटून तो विहिरीत बुडाला. ही बातमी कळताच गावातील युवकांनी त्याला विहिरीत शोधण्याच्या प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यांनतर पाणबुडीच्या सहाय्याने त्याच्या मृतदेह बाहेर काढून दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news