

पुढारी ऑनलाईन डेस्क : गिनीज वर्ड रेकॉर्डने एका फॉक्स टेरियर या जातीच्या २२ वर्षीय कुत्र्याला जगातील सर्वात वयस्कर कुत्रा म्हणून प्रमाणपत्र दिेले आहे. या कुत्र्याचे नाव पेबल्स असे आहे. पेबल्सचा जन्म २८ मार्च २००० रोजी झाला. सध्या त्याचे वय २२ वर्षे ५९ दिवस इतके असल्याचे गिनीज वर्ड रेकॉर्डने म्हटले आहे. (Oldest Dog)
बॉबी ग्रगोरी आणि ज्युली ग्रगोरी हे या पेबल्सचे मालक आहेत. ते अमेरीकेच्या दक्षिण कॅरोलिना या भागात राहतात. पेबल्स हा २००० सालापासून बॉबी आणि ज्युलीच्या कुटुंबातील सदस्य झाला. बॉबीला कुत्र्यांच्या मोठ्या जातींपैकी कुत्रे हवे होते. त्यानंतर बॉबीची नजर टॉय फॉक्स टेरियर जातीच्या कुत्र्यावर गेली. हा कुत्रा प्रत्येक वेळी बॉबीच्या मागे धावू लागला. त्यानंतर त्याला बॉबी आणि ज्युलीने सोबत नेण्याचा निर्णय घेतला. (Oldest Dog)
पेबल्सला काही वर्षांपुर्वी एक साथीदारही होता. परंतु, २०१७ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी रॉकीचे निधन झाले. अन् पेबल्सला त्याचा साथीदार सोडून गेला. पेबल्सला खेळण्यांचीही आवड आहे. तिला यातून मोठा आनंद मिळतो, असे ज्युलीने गिनीड वर्ड रेकॉर्डशी बोलताना सांगितले. (Oldest Dog)