Pune Missing Link Roads: पुण्यातील ३३ ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांचा गुंता कायम; १,२०० कोटींच्या भूसंपादनाची गरज

१३ किलोमीटरचे जोडरस्ते पूर्ण झाल्यास ६० किलोमीटरचे रस्ते जाळे जोडले जाणार; अनेक मार्ग जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत
Road Infrastructure
Road Infrastructure Pudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील विविध भागांना जोडणाऱ्या ३३ 'मिसिंग लिंक' रस्त्यांची सद्य:स्थिती महापालिकेच्या अहवालातून समोर आली असून, अनेक रस्ते भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडकले आहेत. काही ठिकाणी जमीन ताब्यात आल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले, तर काही ठिकाणी जमीनमालकांची भरपाईची मागणी, न्यायालयीन प्रकरणे, बदललेले संरेखन आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांमुळे कामे रखडली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते जाळ्यातील महत्त्वाचे दुवे जोडण्याचे आव्हान कायम आहे. या जोड रस्त्यांची प्रत्यक्ष लांबी १३ किलोमीटर असली, तरी ते विकसित झाल्यानंतर जवळपास ६० किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे एकमेकांना जोडले जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Road Infrastructure
Pune Ganesh Procession Route: गणेश मिरवणुकीसाठी रस्ते चकाचक; पादचाऱ्यांचे पदपथ मात्र धोकादायक!

शहराच्या विविध भागांमध्ये विकास आराखड्यात रस्ते प्रस्तावित आहेत. मात्र, काही ठिकाणी भूसंपादन रखडल्याने किंवा रस्त्यांचा मधला भाग विकसित न झाल्यामुळे संपूर्ण मार्गाचा वापर करता येत नाही. अशा अपूर्ण मार्गांची 'मिसिंग लिंक' म्हणून नोंद करण्यात आली आहे. या सर्व जोडरस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन करण्याकरिता अंदाजे १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली होती. महापालिकेने पहिल्या टप्प्यात १४ महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्राधान्याने विकसित करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी सात रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण झाले आहे.

Road Infrastructure
Pune Crime: आजारी मामाची हत्या करुन भाच्याची आत्महत्या; राजगुरुनगर हादरलं

काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे चालू आर्थिक वर्षात मार्गी लावण्यात येणार आहेत. मात्र, अद्याप १० मिसिंग लिंक रस्त्याचे भूसंपादन देखील सुरू झालेले नाही. सात रस्त्यांचे प्रस्ताव भूसंपादन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. जागामालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात आल्यानंतर या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. तिरुपतीनगर परिसरातील २४ मीटर रुंदीचा रस्ता या योजनेत समाविष्ट आहे. या रस्त्यासाठी बहुतांश जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. मात्र, वन विभाग आणि जैवविविधता उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणाशी संबंधित प्रश्न प्रलंबित आहेत.

Road Infrastructure
PDCC Bank Representative Election: सिद्धेश्वर सोसायटीत मोहिते पाटील गटाची बाजी; सातकर गटाला राजकीय धक्का

बीडीपी क्षेत्रातील रस्त्यांसाठी शंभर टक्के टीडीआर अथवा मोबदला देण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले. शास्त्रीनगर चौक ते गुंजन टॉकीज परिसरातील मिसिंग लिंकचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. ते आगामी आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कर्वेनगर परिसरातील दोन ते तीन जोड रस्त्यांचाही यामध्ये समावेश असून, त्यांची कामे प्रगतिपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोथरूडमधील एकलव्य महाविद्यालय ते महामार्ग आणि शीळाविहार-बिमनगर परिसरातील रस्त्यांसाठी जमीन ताब्यात घेतली असून, काम सुरू झाले आहे.

Road Infrastructure
Pune Ganeshotsav Crowd: पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; मध्यवर्ती पेठांत पायी दर्शन, उपनगरांत दुचाकींवरून भटकंती

बाणेर-पॅन कार्ड क्लब ते नानावरे अंडरपास, सुतारवाडी बसडेपो तसेच न्यू एअरपोर्ट ते विमाननगर या काही मार्गांवरही जमीन ताब्यात घेऊन रस्त्याचे काम सुरू असल्याची नोंद अहवालात आहे. वारजेतील राजाराम पुलापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्या नदीकाठच्या मार्गाचे काम सुरू आहे; तर एनएच रोझरी अंडरपास ते आंबेडकर चौक या मार्गासाठी १२ मीटर रुंदीचा रस्ता प्रथम सुरू करण्याची प्रक्रिया असून, वन विभागाच्या मोजणीची पुष्टी प्रलंबित आहे.

शहरातील ३३ मिसिंग लिंक निश्चित केल्या असून, त्यांची लांबी १३ किलोमीटर आहे. या लिंक विकसित झाल्यास जवळपास ६० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे उपलब्ध होईल. प्राधान्यक्रमातील १४ लिंकपैकी सात ठिकाणचे भूसंपादन पूर्ण झाले असून, उर्वरित सात लिंकची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण भूसंपादनासाठी अंदाजे १,२०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news