Pune Ganesh Procession Route: गणेश मिरवणुकीसाठी रस्ते चकाचक; पादचाऱ्यांचे पदपथ मात्र धोकादायक!

उखडलेले पेव्हर ब्लॉक, तुटलेले पदपथ अन्‌ अडथळ्यांचा विळखा; पुणेकरांना चालण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ
Pune Ganesh Procession Route Cleaning
Pune Ganesh Procession Route CleaningPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीसाठी रस्ते चकाचक करण्याची लगबग महापालिकेने सुरू केली असली, तरी याच मार्गावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. उखडलेले पेव्हर ब्लॉक, तुटलेले पदपथ आणि ठिकठिकाणी निर्माण झालेले अडथळे यामुळे मिरवणूक मार्गावरील पदपथ पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून वाट काढताना आधीच त्रस्त असलेल्या पुणेकरांना आता चालण्यासाठीही रस्त्यावर उतरावे लागत आहे.

Pune Ganesh Procession Route Cleaning
Pune Crime: आजारी मामाची हत्या करुन भाच्याची आत्महत्या; राजगुरुनगर हादरलं

पदपथांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून, अनेक ठिकाणी त्यानुसार कामेही करण्यात आली आहेत. मात्र, रस्त्यांच्या कडेला असलेल्या पदपथांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. वाहनांसाठी रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ अशी मूलभूत व्यवस्था असतानाही पादचाऱ्यांनी सुरक्षितपणे चालायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजीराव रस्त्यावरील पदपथांची अवस्था याचे ठळक उदाहरण आहे.

Pune Ganesh Procession Route Cleaning
PDCC Bank Representative Election: सिद्धेश्वर सोसायटीत मोहिते पाटील गटाची बाजी; सातकर गटाला राजकीय धक्का

नूमवि शाळेसमोरील पदपथासह मुख्य मिरवणूक मार्गावरील अनेक

ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. काही ठिकाणी पदपथाचा भाग तुटल्याने पादचाऱ्यांना थेट रस्त्यावर उतरून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना अपघाताचा धोका वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवात मुख्य मिरवणूक पाहण्यासाठी शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक या मार्गावर येणार आहेत.

Pune Ganesh Procession Route Cleaning
Pune Ganeshotsav Crowd: पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; मध्यवर्ती पेठांत पायी दर्शन, उपनगरांत दुचाकींवरून भटकंती

त्यामुळे या मार्गावर गर्दी वाढण्याची शक्यता असतानाही पदपथांची दुरवस्था कायम राहणे, हे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा धावपळ करीत असताना पादचाऱ्यांच्या वाटेतील खड्डे आणि अडथळे प्रशासनाला दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

Pune Ganesh Procession Route Cleaning
Ujani Dam Fishing: महिलांनी टेबलावर बांगड्या फोडल्यावर 'एमडी' आले जागेवर; मासेमारी ठेक्याला अखेर स्थगिती

पदपथ किमान चालण्यायोग्य तरी करा

मिरवणूक मार्गाचे सुशोभीकरण आणि वाहतूक नियोजनाच्या घोषणा होत असताना नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी आवश्यक असलेले पदपथ मात्र दुरुस्त केले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मिरवणुकीपूर्वी मुख्य मार्गावरील उखडलेले पेव्हर ब्लॉक, तुटलेले भाग आणि इतर अडथळे तातडीने दूर करून पदपथ पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news