Pune Traffic Wardens: पुण्यात ३१६ ट्रॅफिक वॉर्डन नियुक्तीचा निर्णय वादात; निविदा जाहिरात प्रसिद्धीपूर्वीच रद्द

‘पसंतीच्या ठेकेदाराला’ थेट काम देण्याच्या हालचालींची चर्चा; १०.५० कोटींच्या निविदेवरून महापालिका वर्तुळात खळबळ
Traffic Wardens
Traffic WardensPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ३१६ ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा महापालिकेचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वॉर्डन नियुक्तीसाठी तयार करण्यात आलेली निविदा जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका पदाधिकाऱ्याच्या दबावामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू असून, संबंधित पदाधिकाऱ्याच्या मर्जीतील ठेकेदाराला निविदेविना काम देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Traffic Wardens
Ganraya Silver Jewellery: गणरायाला चांदीचा राजेशाही साज; दुर्वा, मोदक अन् हारांना पुण्यात वाढती मागणी

कात्रज-कोंढवा रस्त्यावर सिल्व्हर ओक सोसायटीसमोर दुचाकी आणि कंटेनरची धडक होऊन एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. गेल्या साडेचार वर्षांत या सुमारे साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर ५० पेक्षा अधिक अपघात झाले असून, त्यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले होते.

Traffic Wardens
Pune Lemon Price: लिंबाने पुन्हा गाठला उन्हाळी भाव; गोणी थेट ३ हजारांवर

त्यानंतर वाहतूक पोलिसांना मनुष्यबळाची मदत मिळावी आणि शहरातील वाहतूक नियमन अधिक प्रभावी व्हावे, यासाठी ३१६ ट्रॅफिक वॉर्डनची एका वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १० कोटी ५० लाख ३६ हजार ३२८ रुपयांची निविदा काढण्यात येणार होती.

Traffic Wardens
Mandai Metro Station: गणेशोत्सवात मंडई मेट्रो स्थानकावर एकदिशात्मक प्रवास

११ ते १६ सप्टेंबरदरम्यान निविदाप्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने केली होती. त्यासाठीची जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध होणार होती. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निविदाप्रक्रियेला वेळ लागणार असल्याने तातडीने काम देण्याची सूचना करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, निविदेविना काम देण्याचा अंतिम निर्णय महापालिका आयुक्त घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Traffic Wardens
Pune Airport Narcotics Seizure: पुणे विमानतळावर ३ किलो २८ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त

वॉर्डन नियुक्तीची जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच रद्द

३१६ ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यासाठीची जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध होणार होती. मात्र, जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या काही तास आधीच ती रद्द करण्यात आली. महापालिका सूत्रांच्या माहितीनुसार, एका पदाधिकाऱ्याने निविदा न काढता कलम ६७ क (३) अंतर्गत थेट काम देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. हे काम आपल्या पसंतीच्या ठेकेदाराला देण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचेही सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news