Mandai Metro Station: गणेशोत्सवात मंडई मेट्रो स्थानकावर एकदिशात्मक प्रवास

१४ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष नियोजन; गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांना पर्यायी स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन
Mandai Metro Station
Mandai Metro StationPudhari
Published on
Updated on

पुणे: मंडई स्थानकावर गणेशोत्सव काळात होणारी गर्दी विचारात घेता, महामेट्रो प्रशासनाने मंडई मेट्रो स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने एकदिशात्मक प्रवास योजना लागू केली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात एकाच दिवसात तब्बल ६५ हजार प्रवाशांनी मंडई स्थानकातून प्रवास केला होता. यंदा ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून हे विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षेसाठी महामेट्रो प्रशासनाने प्रवाशांना याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Mandai Metro Station
Pune Airport Narcotics Seizure: पुणे विमानतळावर ३ किलो २८ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त

पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या दर्शनासाठी तसेच विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच नुकत्याच झालेल्या दहीहंडी सणाच्या वेळी मंडई मेट्रो स्थानकात झालेल्या प्रचंड गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशा प्रकारची परिस्थिती टाळण्यासाठी व अनुचित घटना घडू नये, म्हणून महामेट्रो मंडई स्थानकाची व्यवस्था बदलली आहे.

Mandai Metro Station
Pune Fire Department Budget: अग्निसुरक्षेसाठी पुणे महापालिकेची सलग तीन वर्षे शून्य तरतूद

गणेशोत्सव काळात मंडई स्थानकाचे असे असेल नियोजन

  • महात्मा फुले मंडई स्थानक: गर्दीचे नियोजन करण्यासाठी १४ ते २६ सप्टेंबर दरम्यान हे स्थानक एकदिशात्मक असेल. लोकमान्य टिळक पुतळा येथील द्वार क्र. ३ फक्त आत प्रवेशासाठी, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्र. २ फक्त बाहेर पडण्यासाठी खुले राहील. हे स्थानक प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठीच वापरण्याचे आवाहन मेट्रोने केले आहे.

  • दर्शनार्थींसाठी पर्यायी स्थानके: मार्गिका १ (पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) वरील भाविकांनी दर्शनासाठी कसबा पेठ स्थानकाचा वापर करावा. मार्गिका २ ने येणाऱ्या वनाजकडील प्रवाशांनी डेक्कन जिमखाना, तर रामवाडीकडील प्रवाशांनी पीएमसी स्थानकावर उतरावे.

Mandai Metro Station
Pune Inner Ring Road: इनर रिंगरोडच्या भूसंपादनाचा १,०८८ कोटींचा भार पुणे महापालिकेच्या तिजोरीवर

मंडई स्थानकाबाहेर पडणारे दरवाजे गणेशोत्सव काळातील गर्दीच्या तुलनेत छोटे आहेत. अनंत चतुर्दशीच्या वेळी टिळक पुतळा चौकात होणारी गर्दी आणि मेट्रो प्रवाशांची गर्दी एकत्र आल्यास मेट्रो प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडणे कठीण होते. म्हणूनच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही ही मंडई स्थानकासाठी विशेष प्रवासाची नियमावली तयार केली आहे. प्रवाशांनी या नियोजनास सहकार्य करावे.

चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news