Pune 23 Villages Development Plan: पुण्यातील 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात

शहर सुधारणा समितीपुढे प्रस्ताव; मंजुरीनंतर प्रक्रिया वेग घेणार
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेत समाविष्ट 23 गावांचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली. या आराखड्याचा इरादा जाहीर करणे आणि त्यासाठी नगर नियोजन अधिकार्‌‍याची नेमणूक करणे यासाठीच्या मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

Pune Municipal Corporation
Pune Tree Cutting Controversy: महापौर बंगल्यात 19 झाडांची कत्तल; चौकशीचे आदेश

शहर सुधारणासह मुख्य सभेच्या मंजुरीनंतर त्यावर कार्यवाही सुरू होणार आहे. हद्दीलगतच्या 23 गावे जुन 2021 मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

Pune Municipal Corporation
Bhor Village Issue: भोर तालुक्यातील धानवली गावात रस्ता नाही; आदिवासींची जीवघेणी पायपीट

मात्र, ही गावे पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत असतानाच त्यांचा प्रारूप आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली होती. त्यामुळे या गावांचा आराखडा पीएमआरडीएकडून तयारही करण्यात आला होता. मात्र, त्याबाबत प्रचंड तक्रारी आल्याने शासनाने हा आराखडाच रद्द केला होता.

Pune Municipal Corporation
Veer Temple Women Entry: वीर मंदिरात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर निर्णय

त्यामुळे आता शासनाच्या निर्देशानुसार महापालिका हा आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी नगर नियोजन अधिकारी म्हणून शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

Pune Municipal Corporation
Manikdoh Dam Water Level: माणिकडोह धरण 7% वर; जुन्नर परिसरात पाणीटंचाईची भीती

आराखड्यासाठी कमी कालावधी लागणार

महापालिकेला प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी 2 वर्षांची मुदत असणार आहे. मात्र, 23 गावांचा आराखडा करण्याची प्रक्रिया यापूर्वी पीएमआरडीएच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे त्याचा उपयोग आता नव्याने आराखडा तयार करताना होणार असल्याने हा अवधी कमी होऊन कमी कालावधीच आराखडा तयार होईल, असे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news