Pudhari RiseUp Pune Women Badminton: पुढारी राइजअप पुणे महिला बॅडमिंटन स्पर्धेत अश्वी जाधव, कियारा साखरे विजेत्या

नऊ व अकरा वर्षांखालील गटात चमकदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pudhari RiseUp Pune Women Badminton
Pudhari RiseUp Pune Women BadmintonPudhari
Published on
Updated on

पुणे: दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने आणि पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटीन बॅडमिंटन असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित महिलांच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नऊ वर्षांखालील गटात अश्वी जाधव, तर अकरा वर्षांखालील गटात कियारा साखरे यांनी विजेतेपद पटकावले.

Pudhari RiseUp Pune Women Badminton
Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीविरोधात 1,886 पानी आरोपपत्र दाखल

पुढारी राइजअप पुणे महिला स्पर्धेचा चौथा हंगामात महिला बॅडमिंटनपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोरघे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 19 वर्षांखालील गटाच्या एकेरीत अपूर्वा घोलवे हिने प्रथम, तर सानिका बागले उपविजेती ठरली. 17 वर्षांखालील एकेरीमध्ये अनन्या बोंद्रे हिने विजेतेपद, तर आदित्री चौधरी उपविजेती ठरली. 15 वर्षांखालील एकेरीमध्ये ऋत्वा पांडे हिने विजेतेपद, तर इशान्वी काळे उपविजेती ठरली.

Pudhari RiseUp Pune Women Badminton
Pune Municipal Election Analysis: महंमदवाडी–उंड्री प्रभागात काँटे की टक्कर; भाजप-राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागांवर विजयी

13 वर्षांखालील एकेरीमध्ये अनिशा पिंगे विजेती, तर ऋत्वा पांडे उपविजेती ठरली. 11 वर्षांखालील एकेरीमध्ये कियारा साखरे हिने विजेतेपद, तर काश्वी सिंग उपविजेती ठरली. 9 वर्षांखालील एकेरीमध्ये अश्वी जाधव हिने विजेतेपद, तर तिथी वर्मा उपविजेती ठरली. महिला एकेरीमध्ये परिणीता मगदूम हिने विजेतेपद, तर शिवानी शाह हिने उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या दुहेरी प्रकारात 15 वर्षांखालील गटात आदित्री चौधरी आणि ईरा चेऊळकर ही जोडी विजेती, तर अवनी जोशी आणि निहिका तातुगडे ही जोडी उपविजेती ठरली. 13 वर्षांखालील गटात पूर्वा हांडे आणि तेजस्वी चंद्रकांत दरेकर ही जोडी विजेती, तर आराध्या डोंगरे आणि स्वरा पांडे उपविजेती ठरली. 11 वर्षांखालील गटामध्ये अन्वी कुलकर्णी आणि काश्वी सिंग हे विजेते, तर अद्विका पाटील आणि राजलक्ष्मी थेऊरकर उपविजेती ठरले. खुल्या गटामध्ये प्रचिती वेळापुरे आणि शिवानी शाह या जोडीने जेतेपद, तर पायल बी. पाटील आणि सिया बेहेडे ही जोडी उपविजेती ठरली.

Pudhari RiseUp Pune Women Badminton
Umed Mall: राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू होणार; व्यवस्थापन कोणाकडे, जिल्हा निवडीचे कारण काय?

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरीच, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकेडेमीक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, सहप्रायोजक अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेन्टिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले.

दैनिक ‌‘पुढारी‌’तर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या महिला बॅडमिंटन स्पर्धेचे हे 4 थे वर्ष आहे. मुलींच्या आणि महिलांच्या मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. स्पर्धेचं वैशिष्ट्‌‍य म्हणजे स्पर्धेसाठी मुक्त प्रवेश असतो. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी घेतली जात नाही. शिवाय रोख रकमेची पारितोषिके आणि प्रत्येक खेळाडूला सहभागाचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येते. पुणे डिस्ट्रिक्ट मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या कोर्टवर ही स्पर्धा घेण्यात येते. त्यामुळे खेळाडूंना सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या उत्तम प्रतीच्या कोर्टवर उत्तम खेळ करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होते. तसेच पीडीएमबीएच्या सर्व प्रमाणित पंचांकडून त्याच्या खेळाला योग्य न्याय दिला जातो.

रामदास घोरपडे (स्पर्धा रेफरी)

Pudhari RiseUp Pune Women Badminton
Baramati Theft Case: अजित पवारांच्या अंत्यसंस्कारात चोरी; 20.50 लाखांचा मुद्देमाल लंपास, सात जण अटकेत

दै. ‌‘पुढारी‌’चा चांगला उपक्रम आहे. स्वतः बॅडमिंटनपटू असून, प्रत्येक ठिकाणी पाहतो, परंतु मोफत प्रवेश खेळाडूंना दिला जात नाही. वास्तविक बॅडमिंटन हा खर्चिक गेम आहे. परंतु ‌‘पुढारी‌’ने खासकरून महिलांसाठी हा चांगला उपक्रम घेतला आहे. आऊटडोअर गेम कमी होत आहेत. या खेळासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. या स्पर्धेचे अजून मोठे स्वरूप व्हावे आणि आमच्यासारख्या उद्योगपतींनी जास्तीत जास्त सहकार्य करावे.

ज्ञानेश्वर (आबा) चोरघे (व्हॅलेन्टिना इंडस्ट्रीज लि.)

दै ‌‘पुढारी‌’च्या वतीने आयोजित या महिलांच्या स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह खूप दिसून आला. अनेक स्पर्धा शहरात सुरू असतात, पण केवळ महिलांसाठी आणि तेही मोफत प्रवेश असलेली ही एकमेव स्पर्धा आहे. दै ‌’पुढारी‌’ने एवढ्यावरच न थांबता स्पर्धेची व्याप्ती वाढवावी. खेळाडूंना तयार करणाऱ्या पालकांची मानसिकता महत्त्वाची आहे.

आशा राऊत, उपायुक्त, क्रीडा विभाग, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news