

सुरेश मोरे
कोंढवा: महंमदवाडी प्रभाग पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, 2026 महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना हा प्रभाग जोडला गेला. ग््राामीण व शहरी राजकारण एकत्र आले व जिंकणार कोण, यावर अटीशर्ती लागल्या गेल्या होत्या. नात्या-गोत्यांचा जमाव एकत्र आला. यातून तुल्यबळ लढतीचा सामना उभा राहिला. भाजपची घोडदौड थांबवत, राष्ट्रवादीने हॅट्ट्रिक केलेले नगरसेवक प्रमोद भानगिरे यांचा पराभव केला. अखेर भाजप व राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. महंमदवाडी भाजपने दोन व उंड्री राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या.
महंमदवाडी- उंड्री प्रभाग क्रमांक 41 हा शहरी व ग््राामीण भागाला समाविष्ट करून केलेला प्रभाग आहे. या निवडणुकीत प्रत्येक पक्षात तिकिटांची रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र, शेवटच्या क्षणाला उंड्रीचे माजी सरपंच निवॄत्ती बांदल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एबी फॉर्म आणला व सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ओबीसीमधून निवडणूक लढवत हॅट्ट्रिक केलेले नगरसेवक शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग््रेासचे फारुक इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तो न्यायप्रविष्ठ भाग आहे. पण, याकाळात राष्ट्रवादीचे उमेदवार बॅकफूटवर आले होते. त्या वेळी शिवसेना व भाजपमध्ये टक्कर होणार, हे निश्चित झाले होते. मात्र, शेवटच्या तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग््रेासने प्रभागात आघाडी घेतली व भाजपबरोबर त्यांची लढत दिसू लागली. बोगस मतदान पकडले गेले, यावर दावे- प्रतिदावे झाले, मोठा गोंधळही झाला. मात्र, पोलिस प्रशासनाने मतदार यादीत लोकांची नावे असल्यामुळे हात वर केले. या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी साम, दाम, दंड वापरल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, मतदारांचा कौल वेगळाच पाहिला मिळाला. या प्रभागाचा निकाल पाहता शहर आणि ग््राामीण भागात क्रॉस वोटिंग येथे नक्कीच झाले आहे. शेवटी राष्ट्रवादीचे नित्ती बांदल, श्वेता घुले व भाजपचे अतुल तरवडे, प्राची आल्हाट हे या प्रभागात मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
ग््राामीण भागातील उमेदवारांना महापालिकेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. श्वेता घुले व निवत्ती बांदल यांनी सरपंच म्हणून उंड्री परिसरात काम केले आहे. शिवाय, श्वेता घुले यांचे पती सचिन घुले-पाटील यांनी हवेली तालुका उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. यामुळे परिसराच्या अडचणी व लोकांना हवा असलेल्या विकासाची जाण या लोकांना आहे. पालिकेत ही लोक नवखी असली, तरी गावपातळीवरील समाजकारण व राजकारणातील मातब्बर म्हणून त्यांना ओळखले जाते. हडपसर विधानसभेत पालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 33 पैकी 20 नगरसेवक भाजपचे निवडून आल्यामुळे आमदार योगेश टिळेकर यांची ताकद वाढलेली आहे.
प्रभाग क्रमांक 41 महंमदवाडी- उंड्री या प्रभागात 1,23,834 मतदार असताना भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय काँग््रेास पक्ष या प्रत्येकाने आपापले उमेदवार उभे केले. यामध्ये भाजपचे दोन व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन असे एकूण चार नगरसेवक निवडून आले. नाती-गोती, जाती-पातीच्या राजकारणाचा फटका प्रत्येक पक्षाला बसला. या प्रभागात पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी करोडोची विकासकामे केली. शिवसेनेची ताकद या प्रभागात असताना भानगिरे हे चौकार मारण्याच्या तयारीत असताना त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा उंड्री गावचे माजी सरपंच निवृत्ती बांदल यांनी पराभव केला. भाजपचे तरुण उमेदवार अतुल तरवडे हे विजयी झाले. त्यांना नागरिकांनी पसंती दिली. या वेळेस पुन्हा निवडणुकीला उभ्या असलेल्या प्राची आल्हाट या विजयी झाल्या.
2019 मध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका विजया वाडकर यांना भाजपचे तिकीट मिळण्याची अपेक्षा असताना त्यांना नाकारून पिसोळी गावच्या माजी सरपंच स्नेहल गणपत दगडे यांना पक्षाने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या श्वेता घुले यांनी त्यांचा पराभव केला. 2017 मध्ये काँग््रेासमध्ये असताना माजी नगरसेविका विजया वाडकर यांना 5000 मते मिळालेली होती. विजया वाडकर यांची सध्या वाढलेली मते व जनसंपर्क पाहता भविष्यात नक्कीच भाजपला त्यांचा सहभाग फायदेशीर ठरू शकतो. याचबरोबर न्याती सोसायटी व इतर सोसायट्यांमधून उच्चभ्रू मतदार मतदानासाठी घराबाहेर काढण्यात भाजप उमेदवारांना अपयश आल्यामुळे भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. आमदार योगेश टिळेकर यांनी सय्यदनगरमध्ये दोन भुयारी मार्ग करून, वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावला. याचबरोबर महंमदवाडी गावचे नाव महादेववाडी करण्यासंदर्भाचा विधान परिषदेत विषय उपस्थित केला. परंतु, मतदारांपर्यंत विषय पोहोचवण्यात भाजप कार्यकर्ते कमी पडले. एकमेकांच्या चुका नक्कीच झाल्या. पण, प्रचार व पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीमुळे अटीतटीच्या लढतीत भाजपचे अतुल तरवडे, प्राची आल्हाट व राष्ट्रवादी काँग््रेासचे निवॄत्ती बांदल व श्वेता घुले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.