पुणेकरांनी केले पुढारी न्यूज’चे जल्लोषात स्वागत

पुणेकरांनी केले पुढारी न्यूज’चे जल्लोषात स्वागत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'पुढारी न्यूज'चे आज पुणेकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. लक्ष्मी रस्त्यावरील टिळक चौकामध्ये फटाक्याची आतषबाजी करीत विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पुढारी न्यूजला शुभेच्छा दिल्या. जनतेचे प्रश्न
या वाहिनीवरून खर्‍या अर्थाने मांडले जातील, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. पुण्यातील गणेशोत्सव सप्टेबरमध्ये सुरू होत असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. अनेक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फलकावर 'पुढारी न्यूज'ला शुभेच्छा देणारे संदेश झळकवले आहेत. काही मंडळांनी रांगोळ्याची सजावट केली होती. पुढारी कार्यालयाच्या समोरदेखील कर्मचार्‍यांनी फटाके वाजवून 'पुढारी न्यूज'चे जल्लोषात स्वागत केले.

टिळक चौकात आज सायंकाळी गर्दीच्या वेळी राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते 'पुढारी'ला शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमले होते. या वेळी भाजपचे शहर प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस दीपक पवार, राजू परदेशी, सूरेंद्र ठाकूर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, विक्रम दिवेकर, पंकज बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कोहिनकर, सचिन जायभाय, योगेश सातव आदी उपस्थित होते. पर्वती येथील एकता मित्र मंडळाने त्यांच्या एलईडी फलकावर 'पुढारी न्यूज'ला शुभेच्छा दिल्या. तर साईनाथ मंडळ ट्रस्टकडून पोस्टरद्वारे पुढारी न्यूजला शुभेच्छा देण्यात आल्या. नवज्योत मित्रमंडळ ट्रस्टकडूनही शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news