येरवडा कारागृहात कैद्यांसाठी 30 मोबाईल बुथची व्यवस्था

येरवडा कारागृहात कैद्यांसाठी 30 मोबाईल बुथची व्यवस्था
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कैद्यांकडे मोबाईल सापडल्याच्या काही घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा मध्यवर्ती कारागृहातील मोबाईलचा बेकायदा वापर थांबविण्याच्या दृष्टीने कैद्यांसाठी 30 मोबाईल बुथची व्यवस्था करून दिली जाणार आहे. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा देण्यात येणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यातील सर्व कारागृहांमध्ये फोन बुथ सुरू करण्यात येणार आहेत.
एखाद्या कैद्याकडे मोबाईल सापडल्याने इतरांच्या अधिकारांवर गदा आणता येणार नाही. उलट दूरध्वनी सुविधा अधिकृतपणे सुरू झाल्यास मोबाईलचा बेकायदा वापर थांबेल. फोन बुथ सुविधेबरोबरच कैद्यांच्या भेटीची वेळ वाढविण्याबाबतही निर्णय घेतला जाईल. येरवडा कारागृहात बराक क्रमांक एकमध्ये एका कैद्याकडे मोबाईल सापडल्याची घटना मागील महिन्यात उघडकीस आली होती. एप्रिल महिन्यात कारागृहातील स्वच्छतागृहात मोबाईल सापडला होता. त्यातच नुकताच एक मोबाईल सापडला. त्याच धर्तीवर आता कैद्यांना मोबाईल बुथची व्यवस्था करून दिली जाणार आहे.

….तर अन्य कारागृहांबाबतही विचार

सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मोबाईल बुथची संख्या वाढवली जाणार आहे. तसेच राज्यातील सर्व कारागृहांमध्येदेखील ही सुविधा सुरू करण्यात येईल. मोक्का आणि गंभीर गुन्ह्यातील बंदीवान कैद्यांचा यामध्ये सुरुवातीला विचार होणार नसून भविष्यात त्यांना सुविधा देण्याचा विचार केला जाईल, असे  राज्य कारागृह व सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news