पुणे : भरदिवसा शस्त्राच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले

पुणे : भरदिवसा शस्त्राच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शस्त्राच्या धाकाने व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील रोकड तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना विमानगर परिसरात घडली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत व्यावसायिक जखमी झाला असून पळ काढलेल्या चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत सिद्धांत चोरडिया (वय 30, रा. कळसगाव, आळंदी रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरडिया हे व्यावसायिक आहेत. गुरूवारी (3 जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास ते विमाननगरमधील मंत्री आयटी पार्कजवळ सरबताच्या गाडीजवळ थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉप असलेली पिशवी हिसकावली. पिशवी देण्यासाठी चोरडिया यांच्याकडे अडीच हजार रुपये मागितले. चोरडिया यांनी नकार दिल्यानंतर त्यांना कोयत्याचा धाक दाखविण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत चोरडिया जखमी झाले. चोरडिया यांच्या खिशातील अडीच हजार रुपये आणि लॅपटॉप असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले असून महिला पोलीस उपनिरीक्षक एम. बी. जोगन तपास करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news