पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या नवीन omicron व्हेरीएंटचा धोका लक्षात घेवून महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी शाळा तुर्तास बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी जारी केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा omicron प्रदुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य शासनाकडून निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य शासनाने 1 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचे जाहीर करण्यात आला होता. याबाबत मार्गदर्शन तत्वेही जाहीर करण्यात आली होती.त्यानुसार जिल्हा परिषदेने शाळा सुरू करण्याची तयारी केली होती.
दरम्यान, कोरोनाच्या नवीन omicron व्हेरिंएंटच्या वाढत्या धोक्यामुळे मंगळवारी महापालिका अधिकारी व पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 1 डिसेंबर रोजी सुरु न करता परिस्थिती पाहुन 15 डिसेंबरनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.