Preparations for the celebration of Christmas begin
Preparations for the celebration of Christmas begin

नाताळनिमित्त सजली बाजारपेठ

Published on

ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नाताळ हा सण सर्व जाती-धर्मांतील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी नागरिकांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे.नाताळनिमित्त विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून, ख्रिस्ती बांधवांनी सणाची जय्यत तयारी सुरू केली आहे.

शहरातील बाजारपेठा, दुकाने व मॉल्स विविध प्रकारांच्या वस्तू, सांता टोपी, बेल्स, ख्रिसमस ट्री, गिफ्ट पॅकेजसह सजावटीच्या साहित्यांनी सजली आहेत.

नाताळ सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नाताळच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि नाताळप्रेमी नाताळबाबाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत.

लहान मुलांसाठी बाजारात सांताक्लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोज, शूज, पोतडी बॅग्जही आल्या आहेत.बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असून चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणार्‍या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदी होत आहे.

घरातील सजावटीबरोबरच ख्रिसमस ट्रीच्या सजावटीसाठी लागणार्‍या वस्तू, चांदण्या, चॉकलेट्स, झालर, बेल्स, सांताक्लॉजच्या मूर्ती, आकाशकंदील, रोषणाई व सजावटीचे साहित्य, भेटवस्तू, यांनी अनेक दुकाने सजली असून खरेदीसाठी स्ट्रीट शॉपिंग आत्तापासूनच केली जात आहे.

केकशॉप, मॉल्स, सुपर मार्केटसच्या बाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्लॉज, प्रत्येक चौकात सांताक्लॉजच्या टोप्यांचे आणि वेषभूषेचे स्टॉल, याकडे कुतूहलाने पाहणारी बच्चेकंपनी असे दृश्य पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news