सकारात्मक बातमी : राज्यात क्षयरोग रुग्णांच्या नोंदणीत घट

सकारात्मक बातमी : राज्यात क्षयरोग रुग्णांच्या नोंदणीत घट
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात 2023 मध्ये क्षयरोगाच्या नवीन नोंदणीच्या संख्येत घट झाली आहे, गेल्या वर्षी 2022 मध्ये 2 लाख 36 हजार क्षयरोगाच्या रुग्णांची नोंदणी झाली होती. तर, 2023 मध्ये 2 लाख 26 हजार रुग्णांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 10 हजार रुग्णांची नोंद कमी झाली आहे. क्षयरोगाची सर्वाधिक नोंदणी मुंबई महानगर प्रदेशातून झाली आहे. एकूण रुग्णांच्या 36 टक्के नोंदी येथून झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात 17 हजारांहून अधिक रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 6.29 लाख प्रकरणे नोंदवली गेली, तर महाराष्ट्रात 2.26 लाख प्रकरणे नोंदवली गेली.

राज्याच्या सहसंचालक (टीबी) डॉ. सुनीता गोल्हाईत म्हणाल्या,देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात नोंदणी निश्चितच जास्त आहे. गेल्या वर्षीच्या उद्दिष्टापैकी 91 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. नवीन 2.26 लाख रुग्णांपैकी सुमारे 92 टक्के क्षयरुग्णांना त्यांची एचआयव्ही स्थिती माहित आहे आणि 96 टक्के रुग्णांना मधुमेह स्थिती माहिती आहे. क्षयरोग रुग्णांवर उपचार करणे आणि त्यांना योग्य पोषण देणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अधिकाधिक नोंदणी आणि क्षयरोग प्रतिबंधक उपचार हा जीवघेणा संसर्ग पसरण्यापासून रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. मात्र, 2023 मध्ये महाराष्ट्रात क्षयरोगाच्या नोंदणीमध्ये 2022 च्या तुलनेत घट झाली आहे. कोरोनापूर्वी, 2019 मध्ये जानेवारी ते डिसेंबरदरम्यान, राज्यात 2.25 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news