Pimpri News : भाजी मंडईतील स्वच्छतागृहाची दुरवस्था; महिला विक्रेत्यांची होतेय कुचंबना

Pimpri News : भाजी मंडईतील स्वच्छतागृहाची दुरवस्था; महिला विक्रेत्यांची होतेय कुचंबना
पिंपळे गुरव : नवी सांगवीतील भाजी मंडईमधील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा  प्रश्न एैरणीवर आहे. साई चौकातील भाजी मंडईमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह निर्माण करण्यात आले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी मंडई शेजारील डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने स्वच्छतागृहाचे नुकसान झाले होते. सध्या या स्वच्छतागृहाला दरवाजाही नाही. तसेच, यामध्ये लाइट व पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहाच्या आजूबाजूला झाडेझुडपे वाढलेली असल्यामुळे भाजी मंडइमध्ये दुर्गंधी पसरली आहे.
दिवाळीनंतर साई चौकातील भाजी मंडईमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे लवकरच स्वच्छतागृह निर्माण केले जाईल.
– ज्योती राजापूरे, स्थापत्य कनिष्ठ अभियंता 
नवी सांगवीतील भाजी मंडईमध्ये महिला विक्रेत्यांची संख्या जास्त आहे. परंतु, मंडईमध्ये स्वच्छतागृह नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
– एक भाजी विक्रेत्या, 
नवी सांगवी
नवी सांगवीतील भाजी मंडईमध्ये महिला विक्रेत्यांची संख्या जास्त आहे. परंतु, मंडईमध्ये स्वच्छतागृह नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
– एक भाजी विक्रेत्या, 
नवी सांगवी
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news