DJ Lavani Eligibility Certificate: अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम; कार्यक्रमांपूर्वी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक

लोककला, तमाशा, लावणीसह सार्वजनिक कार्यक्रमांच्या संहितेची पूर्वतपासणी; प्रमाणपत्राशिवाय कार्यक्रमांना परवानगी नाही
Lavani
LavaniPudhari
Published on
Updated on

पुणे: लावणी आणि इतर लोककलांच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Lavani
Pune University Scam Allegations: पुणे विद्यापीठात इलेक्ट्रिक उपकरणे, सीसीटीव्ही खरेदीत घोटाळ्याचा आरोप; निनावी पत्राने खळबळ

त्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे आदी कार्यक्रम सादर करण्यापूर्वी त्यांच्या संहिता, निवेदन किंवा सारांशाची तपासणी करून मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. याबाबत सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाने निर्देश जारी केले आहेत.

Lavani
Chakan MIDC Infrastructure: चाकण एमआयडीसीसाठी सरकारचे ‘ॲक्शन मोड’; ३१ ऑगस्टपर्यंत महामार्गावरील सर्व खड्डे बुजवणार

राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांस्कृतिक कार्य विभागाकडे निवेदन देऊन लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील 'डीजे लावणी' आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे सचिव सं. पुं. खामकर यांनी राज्याचे पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त आणि सर्व जिल्हा पोलिस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे.

Lavani
Pune Modern Cowsheds: पुण्यात ३४ गावांतील गायरान जमिनीवर आधुनिक गोशाळा; पशुवैद्यकीय रुग्णालये, चारा बँकेचा मार्ग मोकळा

सार्वजनिक ठिकाणी लावणी सादर करण्यासाठी संबंधितांनी संहिता, निवेदन किंवा सारांश मंडळाकडे पूर्वनिरिक्षणासाठी सादर करून योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. लावणीमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करून कला सादर करणे अपेक्षित आहे. प्रमाणित संहिता, निवेदन किंवा सारांशापेक्षा वेगळा अश्लील अथवा आक्षेपार्ह भाग कार्यक्रमात आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर स्थानिक पातळीवरून कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Lavani
Pune Solapur Road Traffic: सोलापूर रस्त्यावरील कोंडी सुटणार? जंक्शन सुधारणेसाठी महामेट्रोचा २७५ कोटींचा आराखडा

तसेच प्रमाणपत्र असल्याची खातरजमा केल्यानंतरच कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्याबाबत आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या स्तरावरून सूचना जारी कराव्यात, असे मंडळाच्या वतीने पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे संगीत, आक्षेपार्ह नृत्यप्रकार आणि अश्लील आशयाचे कार्यक्रम सादर होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या निर्णयामुळे अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पारंपरिक लावणी, लोककला आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्यास मदत होणार आहे.

बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news