PMP Walkie Talkie: पीएमपी चालक-वाहकांना आता वॉकीटॉकी

पोलिसांप्रमाणे कम्युनिकेशन सिस्टीम ॲक्टिव्ह; कंट्रोल रूमशी थेट संपर्कामुळे सुरक्षा व सेवा मजबूत
PMP Walkie Talkie
PMP Walkie TalkieFile Photo
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी तब्बल 18 वर्षांपूर्वी बंद पडलेली वायरलेस (वॉकी-टॉकी) यंत्रणा पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रस्त्यात बस बेकडाऊन झाल्यास किंवा अन्य कोणतीही अडचण आल्यास पीएमपीच्या चालक-वाहकाला शहरात कोठेही तातडीने मदत पुरवता येणार आहे. ही यंत्रणा पोलिस स्टाईल कम्युनिकेशन करणारी असणार असून, लवकरच प्रत्येक चालक-वाहकाकडे ‌‘वॉकी-टॉकी‌’ पाहायला मिळणार आहे.

PMP Walkie Talkie
Purandar Rice Harvesting: पुरंदरच्या पश्चिम भागात भात कापणीला वेग

पीएमपीला वारंवार येणाऱ्या कम्युनिकेशन गॅपच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी हा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या बसमध्ये वॉकी-टॉकी बसवून कंट्रोल रूमशी थेट संपर्क साधणे चालक-वाहकांना आता शक्य होणार आहे.

यामुळे अपघात किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास मदतीसाठी लागणारा वेळ कमी होऊन सेवा अधिक वेगवान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

PMP Walkie Talkie
Nimone Gunat Road Reopened: तब्बल 26 वर्षांनंतर निमोणे-गुणाट शीव रस्ता खुला

उच्च दर्जाचे वॉकी-टॉकी संच खरेदी करणार

पीएमपीसाठी आवश्यक असलेली वायरलेस फिक्वेन्सी गेली 18 वर्षांपूर्वीच मंजूर झालेली आहे. पूर्वी मोबाईल नव्हते, तेव्हा पीएमपी चालक-वाहकांशी प्रशासनाचा थेट वॉकी-टॉकीने संपर्क होत असे. मध्यंतरीच्या काळात मोबाईल, व्हॉट्‌‍सॲप, ई-मेल आले. मात्र, तरीही पीएमपीची सेवा पुरवताना अनेक ठिकाणी व्यवस्थित कम्युनिकेशन होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांप्रमाणेच प्रवाशांना तत्काळ सेवा पुरवण्यासाठी ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय अध्यक्ष पंकज देवरे यांनी घेतला आहे. पीएमपी आता मोटोरोला कंपनीचे उच्च दर्जाचे वॉकी-टॉकी संच खरेदी करणार आहे.यामुळे पोलिसांप्रमाणेच बसमधील चालक-वाहक तत्काळ संदेश पीएमपी कंट्रोल रूमला पाठवू शकतील. यामुळे शहरातील कोणत्याही भागातून मदत त्वरित उपलब्ध करणे शक्य होणार आहे.

PMP Walkie Talkie
Wedding DJ Noise Pollution: लग्नसराईत डीजेचा धडाका; कर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषणाचा विळखा

प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर सेवा देणे, हे पीएमपीचे प्रथम उद्दिष्ट आहे. पूर्वी ही वायरलेस यंत्रणा कार्यान्वित होती, परंतु काही कारणास्तव ती बंद पडली होती. आता आम्ही ही फिक्वेन्सी पुन्हा तातडीने ॲक्टिव्ह करत आहोत. बसमधील कोणतीही अडचण कंट्रोल रूमला तत्काळ समजल्यास, मदतीसाठी लागणारा वेळ जवळजवळ शून्यावर येईल. यामुळे फक्त दळणवळण सुरळीत होणार नाही, तर पीएमपीच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेतही मोठी वाढ होईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news