PMP News : वाहतुकीच्या नियमांना ‘खो’ देत पीएमपी सुसाट

PMP News : वाहतुकीच्या नियमांना ‘खो’ देत पीएमपी सुसाट

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लाल सिग्नल असतानाही जोरात पीएमपी दामटणे, बीआरटी रस्ता पार करताना मध्ये आलेल्या वाहनांजवळून सुसाट गाडी पळविणे, एखाद्या वाहनाच्या अगदी जवळ जोरात कचकन ब्रेक दाबणे, दुसर्‍या वाहनास खेटून गाडी थांबविणे असे प्रकार सर्रास पीएमपीचालकांचे सुरू आहेत. तसेच वेळोवेळी मेंटनन्स न केलेल्या गाड्या रस्त्यामध्ये बंद पडत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

वाहतुकीच्या नियमांना खो देत काही पीएमपीचालक रॅश ड्रायव्हिंग करीत सुसाट वाहन दामटवत असल्याने यावर्षी अपघाताच्या 102 घटना घडल्या असून, 113 व्यक्तिंचा अपघात झाला आहे. या अपघात ग्रस्तांपैकी 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार दररोज घडत असतानाही वाहतूक शाखा अथवा आरटीओच्या वतीने कुठलीच कारवाई होत नसल्याने चालकांना कुणाचाच धाक उरला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 21 अपघाताच्या घटना घडल्या असून, यामध्ये 113 व्यक्तींना अपघातास सामोरे जावे लागले आहे. या अपघातामध्ये एकाच महिन्यात 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news