

पुणे: शहरातील अनधिकृत होर्डिंगला अभय देणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगची खोटी आकडेवारी देणार्या वरिष्ठ निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, कनिष्ठ लिपिकाची जुलै महिन्याची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आयुक्तपदी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची ठोस भूमिका जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडून त्यांच्या हद्दीत नक्की किती अनधिकृत होर्डिंग आहेत, याची माहिती मागविली होती. (Latest Pune News)
यांची वेतनवाढ रोखण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले. त्यात 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत केवळ 24 च अनधिकृत होर्डिंग असल्याचे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या निरीक्षकांकडून कळविण्यात आले होते. त्यात नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 7 अनधिकृत होर्डिंग असल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, निरीक्षकांनी पाठविलेल्या आकडेवारीची सत्यता तपासण्यासाठी मुख्य खात्याकडून स्वतंत्र पथकामार्फत तपासणी करण्यात आली. त्यात नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 35 अनधिकृत होर्डिंग असल्याचे आढळून आले होते.
त्यावर या क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ परवाना निरीक्षक विनोद लांडगे आणि कनिष्ठ लिपिक राजेंद्र केवटे यांच्याकडून आकाशचिन्ह परवाना निरीक्षकांनी खुलासा मागविला होता. मात्र, लांडगे आणि केवटे यांनी दिशाभूल करणारा खुलासा देऊन अनधिकृत होर्डिंगला पाठीशी घातले असल्याचे स्पष्ट झाल्याने लांडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर केवटे