

पुणे: परराज्याँतील अमली पदार्थ तस्कराला फरासखाना पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून 75.36 ग्रॅम वजनाच्या सात लाख 74 हजार रुपये किमतीच्या एकूण 718 याबा गोळ्या जप्त केल्या आहेत.
निशान हबीब मंडल (वय 47, रा. बंगळूरू, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई गजानन सोनुने (वय 43) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंडल याच्या विरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि.16) पथक गस्तीवर होते. त्या वेळी बंगळूरुमधील एक तस्कर अमली पदार्थयुक्त याबा गोळ्या विकण्यासाठी बुधवार पेठेतील कॅसेट गल्लीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सापळा रचून पहाटे पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 75.36 ग्रॅम वजनाच्या 718 गोळ्या, एक दुचाकी, चार मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सहा लाख 58 हजार 860 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे, निरीक्षक अजित जाधव, सहाय्यक निरीक्षक शीतल जाधव, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, कर्मचारी महेश राठोड, प्रवीण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, अकबर कुरणे, शशीकांत ननावरे, सुमित खुट्टे, चेतन होळकर, प्रशांत पालांडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.