

Sant Dnyaneshwar Palkhi 2025
पुणे: शुक्रवारी पहाटे पाच वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे आगमन भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात झाले. यावेळी माऊलींच्या पादुकांची आरती करण्यात आली, त्यानंतर ग्यानबा तुकारामचा गजर झाला आणि शहरातील भाविकांची एकच गर्दी दर्शनासाठी झाली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरहुन आळंदीकडे जाताना प्रतीच्या प्रवासात शुक्रवारी पहाटे पुणे मुक्कामी पोहोचली. पहाटे साडेतीन वाजता पालखी हडपसर येथून पावणेचार वाजता रेसकोर्स मैदानाजवळ आली तेथे अर्ध्या तासाचा तासाचा विसावा झाला. त्याठिकाणी भाविकांनी वारकरी बांधवना चहा- नाष्टा याची सेवा दिली.(Latest Pune News)
त्यानंतर पुन्हा हरिपाठाचे अभंग आणि ज्ञानबा- तुकाराम च्या गजरात पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात पोहोचली तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांची विधिवत आरती करण्यात आली.शुक्रवारी दिवसभर माऊलींच्या पादुकांचा मुक्काम शहरात राहणार असून शनिवारी पहाटे सहा वाजता पालखी आळंदीकडे मार्गस्थ होईल.