PMC Road Work Fine: धायरीतील निकृष्ट रस्ताकामावर महापालिकेची कारवाई; ठेकेदाराला 10 लाखांचा दंड

समान पाणीपुरवठा योजनेतील कामात गंभीर त्रुटी उघड; आयुक्तांच्या पाहणीनंतर पुन्हा काम करण्याचे आदेश
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: धायरी परिसरात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत झालेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित ठेकेदारावर महापालिकेने 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करीत निकृष्ट दर्जाचे काम उघडकीस आणले आणि तातडीने दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.

Pune Municipal Corporation
CBSE Revaluation 2026: सीबीएसई बारावी उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाची सुविधा

समान पाणीपुरवठा योजनेची कामे अंतिम टप्प्यात असताना शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामांनंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. धायरीतील उंबऱ्या गणपती परिसरात दोन महिन्यांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. त्यानंतर खोदलेला रस्ता दीर्घकाळ दुरुस्त न करता तसाच ठेवण्यात आला होता.

Pune Municipal Corporation
Baramati Illegal Liquor Trade: बारामतीत हातभट्टी दारूचा सुळसुळाट; ताडीविक्रीमुळे जीवितहानीनंतरही कारवाई अपुरी

दरम्यान, मंगळवारी (दि. 26 मे) रात्री संबंधित ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून रस्ता पूर्ववत करण्याचे काम करण्यात आले. मात्र, काँक्रीट टाकल्यानंतर ते व्यवस्थित सुकावे आणि त्यावर वाहनांची ये-जा होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी, काही तासांतच नव्याने केलेल्या काँक्रीटचा थर उखडण्यास सुरुवात झाली.

Pune Municipal Corporation
Illegal Liquor Production: जुन्नर तालुक्यात गावठी दारूभट्टींचा सुळसुळाट; वारंवार कारवाईनंतरही व्यवसाय सुरूच

या प्रकाराची दखल घेत आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी शनिवारी घटनास्थळी भेट दिली. पाहणीदरम्यान संबंधित ठेकेदार कंपनीने काँक्रीटवर पोती टाकून काम झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, ती पोती हटविल्यानंतर कामाचा निकृष्ट दर्जा स्पष्टपणे समोर आला. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी स्वतः काँक्रीटची स्थिती तपासून कामात गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आणले.

Pune Municipal Corporation
Illegal Liquor Trade: दौंडमध्ये अवैध दारू व्यवसाय तेजीत; भीमा नदीमार्गे होत असल्याचा पुरवठ्याचा आरोप

त्यानंतर आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित ठेकेदारावर 10 लाख रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. याशिवाय, निकृष्ट दर्जाचे झालेले रस्त्याचे काम ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्यात येणार असून, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेले रस्तादुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे आढळले आहे. संबंधित ठेकेदाराकडून हे काम पुन्हा करून घेतले जाईल तसेच त्याच्यावर 10 लाख रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाची कामे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत.

नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news