नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाला आम्ही प्रथमपासूनच विरोध करीत होतो. या मार्गावरील अपघातात अनेकजणांना जीव गमवावा लागला. बीआरटी बससेवेला आमचा विरोध नाही. ती रस्त्याच्या कडेने सुरू ठेवावी.
– कनीज सुखराणी, सामाजिक कार्यकर्त्या.
मेट्रोच्या कामामुळे बीआरटी विस्कळीत झाली. महापालिकेने व वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आणि त्याचे खापर बीआरटीवर फोडण्यात आले. नगर रस्त्यावरून शिरूरच्या दिशेने बीआरटी मार्गातून प्रवासी जलद गतीने प्रवास करतात. रोज एक लाख प्रवासी पीएमपी बसमधून या मार्गावरून जात असल्याने, त्यांची आता गैरसोय होणार आहे. याचा फटका या भागातील रहिवाशांना बसणार आहे. त्यामुळे बीआरटी बससेवा सुरू ठेवावी, अशी आमची मागणी आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर.
नगर रस्त्यावरील पर्णकुटी ते विमाननगर यादरम्यान बीआरटी मार्ग ठिकठिकाणी आधीपासूनच विस्कळीत स्वरूपात होता. मेट्रोचे खांब उभारल्यानंतर अनेक ठिकाणी बीआरटी मार्गातून बसगाडी जाऊ शकत नव्हती. येथे अनेक अपघात झाले, त्यामुळे तो स्वतंत्र मार्ग हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. सव्वातीन किलोमीटर अंतरापैकी दोन किलोमीटरवर बीआरटी नव्हती. उर्वरित सव्वा ते दीड किलोमीटर अंतरातील रस्त्यावरील अडथळे दूर केले. रामवाडीपासून पुढील मार्गावर बीआरटी सुरू राहील.
– विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे