पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक घ्यावी आणि मराठा समाजाचा जास्तीत जास्त फायदा कशात आहे, ते पदरात पाडून घ्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्याच्या दोन्ही सभागृहांसह सर्व नागरिकांची इच्छा आहे. मात्र, एका समाजाचे काढून दुसर्या समाजाला देण्याची राज्याची संस्कृती नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. भुजबळ आणि जरांगे यांच्या वादात पडायचे नसल्याचेही ते म्हणाले.