Crime News: आई-मुलाच्या डोक्याला लावले पिस्तूल; सराईत गुंडांची गावठी पिस्तूल, कोयते फिरवून खानापुरात दहशत

खानापूरमध्ये सराईत गुंडांनी हातात दोन गावठी पिस्तूल व कोयते घेऊन हैदोस घातला
Pune Crime
आई-मुलाच्या डोक्याला लावले पिस्तूलPudhari Photo
Published on
Updated on

खडकवासला : सिंहगड पायथ्याच्या दाट लोकवस्तीच्या खानापूरमध्ये सराईत गुंडांनी हातात दोन गावठी पिस्तूल व कोयते घेऊन हैदोस घातला. रिक्षा, कार, टेम्पो, मोटारसायकल आदी 14-15 वाहनांची तोडफोड करीत प्रसाद महादेव जावळकर याच्या घरात शिरून आई भारती जावळकर व प्रसाद यांच्या डोक्यावर पिस्तूल धरून ठार मारण्याची धमकी दिली तसेच घरातील टीव्ही व इतर मालमत्तेचे नुकसान केले.

हा प्रकार मंगळवारी (दि. 24) रात्री साडेनऊ व बुधवारी (दि. 25) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेने खानापूर गावासह सिंहगड, पानशेत भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, किरकोळ कारणावरून सराईत गुंडांनी घरावर तसेच गावातील वाहनांवर हल्ला करून तोडफोड केली तसेच गावठी पिस्तूल, कोयते अशी प्राणघातक शस्त्रे घेऊन हैदोस घातल्याप्रकरणी हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. याबाबत हवेली पोलिसांनी सांगितले की, खानापूर गावातील दिलशान अली यांच्या सलून दुकानाजवळ प्रसाद जावळकर याने माझा मित्र विकास सोपान जावळकर याला तुझ्यासोबत यायचे नसताना त्याला तू जबरदस्ती का करतो? असा जाब हल्लेखोर प्रणव रणधीर याला विचारला. त्या वेळी मानव पोपट जाधव याने विकास जावळकर याला जिवे मारण्याची धमकी दिली. नंतर प्रणय रणधीर व त्याच्या साथीदारांनी प्रसाद, विकास जावळकर व रोहित राजू जावळकर यांना शिवीगाळ करीत दमदाटी दिली. त्या वेळी प्रणव रणधीर याने तन्मय धिवार याच्या कमरेचे गावठी पिस्तूल हातात घेऊन प्रसाद याला गोळी मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी प्रसंगावधानतेने प्रसाद जावळकर हा तेथून पळून गेला. नंतर त्याने हवेली पोलिस ठाण्यात प्रणव रणधीर व त्याच्या साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली.

Pune Crime
Drug Racket Pune: आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटच्या पटलावर पुणे

प्रसाद हा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्याने चिडून जाऊन प्रणव रणधीर व त्याच्या साथीदारांनी नंतर आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास प्रसाद जावळकर याच्या घरात शिरून जोरदार हल्ला केला. त्यात घरातील टीव्हीसह प्रापंचिक मालमत्तेचे हातातील गावठी पिस्तूल, कोयत्यांनी तोडफोड करीत नुकसान केले. त्या वेळी प्रसादची आई भारती जावळकर साहित्य वाचवण्यासाठी पुढे गेली असता तिच्या डोक्यावर पिस्तूल धरत प्रणव रणधीरने, तुझ्या मुलाने पोलिसांत आमच्याविरोधात तक्रार दिली तर तुमच्या सर्व घरादाराला जिवे मारू, अशी धमकी दिली. जोरदार आरडाओरडा ऐकून गावातील लोक प्रसादच्या घरासमोर जमा झाले, त्या वेळी हातात पिस्तूल, कोयते घेऊन हल्लेखोरांनी घरासमोर उभ्या असलेल्या गाड्यांची तसेच भैरवनाथ मंदिर व सरकारी दवाखान्याजवळील वाहनांची तोडफोड करीत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत दहशत निर्माण केली.

Pune Crime
Pune: पुणे महानगरपालिकेचा कारभार होणार पेपरलेस

याप्रकरणी हवेली पोलिसांनी प्रणव ऊर्फ चिक्या रणधीर, तन्मय ऊर्फ पिनुड्या तानाजी धीवार, अथर्व ऊर्फ झिंग्या दिलीप गायकवाड, आयुष ऊर्फ लाल्या प्रवीण सोनवणे, आदित्य पोपट जाधव (सर्व राहणार खानापूर, ता. हवेली) यांच्यासह 15 जणांविरोधात भादंवि 109, 333 आदी कलमांखाली सशस्त्र प्राणघातक हल्ला, बेकायदा जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान, दहशत माजविणे, असा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक शीतल टेंबे, पोलिस अंमलदार संतोष तोडकर, संतोष भापकर यांचे पथक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news