

पुणे : पुणे महापालिकेचे कामकाज अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे करण्यासाठी ’ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यासंबंधीचे प्रशिक्षण आणि अन्य तयारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ही प्रणाली सर्व विभागांत राबविण्यात येणार असून यामुळे पालिकेचे कामकाज पेपरलेस होणार आहे.
महापालिकेच्या कारभारात सध्या ऑनलाइन यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ’इंटीग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’च्या (आयडब्ल्यूएमएस) माध्यमातून विविध कामांचे नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनीही प्रशासन अधिक पारदर्शी करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणांचा वाढता वापर करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत महापालिकेच्या विद्यमान ऑनलाइन यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. तसेच गेल्या वर्षीपासून सुरू असलेली ’ई-ऑफिस’ प्रणाली विविध विभागांत टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. या नव्या प्रणालीच्या माध्यमातून विविध विभागांचे प्रस्ताव, कागदपत्रे, मान्यतेचे प्रक्रिया इत्यादी आता डिजिटल पद्धतीने हाताळली जाणारअसल्याचे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगीतले.
या नव्या प्रणालीमुळे महानगर पालिकेचा कारभार ’हायटेक’ होणार आहे. पालिकेकडे येणारे विविध प्रस्ताव एका टेबलावरून दुसर्या टेबलावर जाताना फाइल-कागदपत्रे गहाळ होणे, फाइल मंजूर होण्यास विलंब लागणे या बाबतीतील अनेक अडचणी आता कमी होणार आहेत. यासाठी या नव्या प्रणालीचे कर्मचार्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांना आयडीदेखील देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रस्ताव तयार करण्यापासून बिल मंजुरीपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. प्रस्तावांवर ई-साइन करण्याची सुविधाही लवकरच सुरू होणार असून, संपूर्ण महापालिकेत ही यंत्रणा लागू केली जाणार