Pimpri : तंत्रज्ञान विकास हा पुढारलेल्या देशाचा मापदंड; डॉ. काकोडकर

Pimpri : तंत्रज्ञान विकास हा पुढारलेल्या देशाचा मापदंड; डॉ. काकोडकर

लोणावळा : आर्थिक सुबत्ता किंवा सामरिक शक्ती या पुढारलेल्या देशाचे मापदंड ठरत नाही, तर सर्वात आधी तंत्रज्ञान विकसित करणारा देश हाच खर्‍या अर्थाने पुढारलेल्या देशाचा मापदंड ठरू शकतो, असे प्रतिपादन भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. लोणावळा शहरात विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्ट आणि नारायण भार्गव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये साडेबारा हजार चौरस फूट एवढ्या जागेत भारतातील पहिली स्पेस अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. कार्यक्रमात डॉ. प्रमोद काळे, डॉ. सुरेश नाईक, डॉ. सुधीर कुमार, डॉ. जगदीश मठ, डॉ. पंडित विद्यासागर, नारायण भार्गव, डॉ. व्यंकटेश गंभीर, राजन छापवाले, ट्रस्टचे अध्यक्ष माधव भोंडे, सचिव राधिका भोंडे, कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे प्रमुख डॉ. संजय पुजारी उपस्थित होते.

चाकोरीबद्ध मानसिकता बदलण्याची गरज

डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण हे कितीही वाईट वाटत असले तरी त्या शिक्षणाचा जीवनात काहीना काही उपयोग होतच असल्याचे नमूद केले. सध्या नवीन शिक्षण पद्धतीचा बोलबाला असून ती अतिशय उत्तम आहे. मात्र, या शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी करीत असताना त्याचा बोजवारा उडेल की काय, अशी शंका निर्माण होत आहे. तसेच, त्यासाठी आपली चाकोरीबद्ध चालत आलेली मानसिकता बदलावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news