पिंपरी : भातुकलीच्या खेळातील राजा राणी हरवले

पिंपरी : भातुकलीच्या खेळातील राजा राणी हरवले

Published on

पिंपरी : शशांक तांबे : भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी.. यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांनी 1960 च्या दशकात भातुकलीचे गरुड सर्वांच्या मनात कोरले होते.

आता मात्र लहान मुलांच्या खेळण्यातून राजाराणी, भातुकली गायब झाली असून त्याची जागा हायटेक खेळण्यांनी घेतली आहे. बाजारात विविध प्रकारची हायटेक खेळणी आल्याने पूर्वीच्या भातुकली, सापशिडी, व्यापार या खेळांना खेळण्यांच्या दुकानात स्टॉक रूमची जागा
मिळाली आहे. त्याची जागा हायटेक खेळण्यांनी घेतली असल्याने लहान मुलांमध्ये हायटेक गोष्टींचे कुतूहल निर्माण झाले आहे.

यापूर्वी भातुकलीमधील खेळणी मातीची असायची, त्यानंतर स्टील आणि तांब्याची खेळणी आली हळूहळू प्लास्टिकमध्ये ही खेळणी यायला सुरुवात झाली. लहान मुले भातुकली हा खेळ विसरून गेली आहेत. मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स खेळण्यांनी लहान मुलांच्या मनात स्थान मिळवले आहे.

रिमोट कंट्रोल विमान, गाडी, लहान मुलांसाठी ड्रोन, चार्जिंग कार, बाईक, टाळी वाजवली की चालणारे कार्टून, चित्रावर पेन ठेवला की चित्र कोनात आहे हे सांगणारे पेन, रेकॉर्डिंग पोपट, सुपर हिरोज, बॅटरीवरील फुटबॉल सेट आणि बोलणारा रोबो अशा अनेक प्रकारच्या खेळण्यांनी लहान मुलांना आकर्षित केले आहे. त्यामुळे पूर्वीची खेळणी दुकानात स्टॉक रुममध्ये पडून आहेत. क्वचित या खेळांसाठी ग्राहक येत असल्याचे व्यापारी सांगतात.

आपल्या मुलाला हायटेक गोष्टी वापरता याव्यात म्हणून पालकदेखील मुलांना नवीन खेळणी घेऊन देण्यास इच्छूक असतात. गेल्या चार-पाच वर्षांत लहान मुलांच्या हातात मोबाईल आल्याने खेळांकडे लहान मुलांचे दुर्लक्ष झाले आहे. दुकानात आल्यावर लहान मुलांच्या दृष्टीस महागडी, हायटेक खेळणी पडतील अशा प्रकारे खेळण्यांची मांडणी केली जाते.

बच्चे कंपनी येत होती एकत्र भातुकलीचा खेळ म्हणल्यावर सगळे मित्र एकत्र यायचे, त्यावर गुळ, शेंगदाणा, साखर याचा स्वयंपाक व्हायचा. त्यानंतर सगळ्यांची पंगत बसायची. बच्चे कंपनी एकत्र येऊन खाण्यावर ताव मारायचे.

अभ्यासाच्या वस्तूंवरही कार्टून पेन्सिल, दप्तर, पाण्याची बाटली, स्केचपेन, खोडरबर या वस्तूंवरही कार्टून असते. लहान मुले त्यांना आवडणारे कार्टून असणार्‍या वस्तू लगेच घेतात. तसेच, मुलांना याच गोष्टींचे आकर्षण जास्त आहे.

चंपक, ठकठक, चांदोबा गायब उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चंपक, ठकठक, चांदोबा ही पुस्तके आवर्जून बाजारात मिळायची. ही पुस्तके वाचायलादेखील छान वाटायची. आता मोबाईलने जागा घेतल्याने लहान मुलांमध्ये वाचन राहिले नाही.
कार्टूनमध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट

खेळणी स्वरूपात लहान मुलांना नव नवीन खेळण्यांचे आकर्षण जास्त असल्याने बाजारात येणारी प्रत्येक नवीन गोष्ट मुलांना माहिती असते. त्यामुळे खेळणीदेखील तशा प्रकारची बनतात. लहान मुलांवर कार्टूनचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे कार्टूनमध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट खेळणी स्वरूपात उपलब्ध असल्याचे खेळण्यांच्या व्यापार्‍यांनी सांगितले.

कार्टूनमध्ये असणारी विमान, गाडी घेण्याकडे कल

चार ते पाच वर्षांत लहान मुलांचा कल नवीन कार्टून आणि कार्टूनमध्ये असणारे विमान, गाडी घेण्याकडे जास्त वाढला आहे. वेबब्लेड या वस्तूला अजूनही मागणी आहे. लहान मुले कार्टून जास्त बघतात आणि त्यातील वस्तू मागतात. सध्या डोरेमॉन कार्टूनमधील डोक्यावरील पंख्याची मागणी जास्त आहे. त्यासोबतच तीन महिन्यांतून परत येणार्‍या ग्राहकांची संख्या जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news