Pimpri News : कर संवादमध्ये मालमत्ताधारकांच्या शंकाचे निरसन

Pimpri News : कर संवादमध्ये मालमत्ताधारकांच्या शंकाचे निरसन
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ऑनलाइन मालमत्ता हस्तांतरण कसे करायचे, घर महिलेच्या नावे असेल, तर करआकारणीमध्ये किती सूट मिळते, त्यासाठी काय कागदपत्रे लागतात यासारख्या अशा विविध शंकांचे निरसन करसंवादमध्ये करण्यात आले. करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या विभागातील अधिकार्‍यांनी 'ऑन दी स्पॉट' उत्तरे दिली. या संवादमध्ये शहरात सध्या सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. हे सर्वेक्षण मालमत्ताधारकांच्या कसे फायद्याचे आहे, याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

त्यानुसार, सर्वेक्षणामध्ये आकारणी न झालेल्या मालमत्ता कर कक्षेत आणून सर्व मालमत्तांना सुलभ क्रमांक देऊन मालमत्तेची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. मालमत्ता सर्वेक्षणात युपीक आयडी दिल्यामुळे भविष्यात महापालिकेच्या सर्व सेवा, शासनाचे इतर विभाग यांच्यात समन्वय राहण्यासाठी उपयुक्त होणार आहे.

नागरिकांची डिजिटल गोपनीयता जपली जाणार

नागरिकांना 'डिजी लॉकर'च्या धर्तीवर मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे 'प्रॉपर्टी लॉकर'च्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याची सुविधा असणार आहे. मालमत्तेची अचूक मोजणी करून माहिती व पत्ता अद्ययावत करणे, मालमत्तेची विश्वासार्हता वाढून खरेदी, विक्री व्यवहार सुलभ होण्यास मदत, मालमत्ता कर आकारणीबाबत संपूर्ण माहितीचे संकलन केली जाणार आहे. मालमत्तेअंतर्गत असणार्‍या रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॉवर, घनकचरा विलगीकरण आदी सुविधांबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जागेवरच मिळणार्‍या सवलतीबाबत नोंद करण्यात येणार आहे.

हे करत असताना नागरिकांची डिजिटल गोपनीयता जपली जाणार आहे. मालमत्ताधारकांची कागदपत्रे महापालिकेला सार्वजनिक करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार नागरिकांकडेच असणार आहे. यासंदर्भात सर्व माहिती, प्रश्नांची उत्तरे या करसंवादमध्ये सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्यासह त्यांच्या टीमने दिली.

घर बसल्या सुटतात प्रश्न-

मालमत्ताधारकांचे विविध प्रश्न असतात. मात्र, वेळेअभावी ते कार्यालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच विभागाच्या वतीने ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पध्दतीने महिन्याच्या शेवटच्या शनिवारी करसंवाद घेण्यात येत आहे. घर बसल्या प्रश्न सुटत असल्याने मालमत्ताधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news