Pimpri News : अनधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई

Pimpri News : अनधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जुनी सांगवी, दापोडी परिसरात धडक कारवाई करण्यात आली. या वेळी फुटपाथ, रस्त्यावरील, भर चौकातील अनाधिकृत फटाके स्टॉलवर अतिक्रमण विभागाकडून बुधवारी दहा ते पाच यावेळेत धडक कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांच्या आदेशानुसार जुनी सांगवी, दापोडी परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून धडक मोहीम राबविण्यात आली.

अनेक व्यवसायिक विक्रेत्यांकडे महापालिकेचा, पोलीस परवाना नसताना भर चौकात, पदपथावर, रस्त्यावर अनधिकृतरित्या गर्दी करून विक्री करीत असल्याने तसेच सणासुदीच्या काळात वाहतुकीस, परिसरातील नागरिकांना पायी चालताना रस्त्यावर अडथळा निर्माण होत असल्याने अतिक्रमण विभागाकडून बुधवारी धडक कारवाई करण्यात येत होती.

या वेळी अतिक्रमण पथकाच्या अधिकार्‍यांशी हुज्जत घालून वादविवाद करताना दिसून आले. या कारवाईत कनिष्ठ अभियंता सुषेन उगले, संदीप हजारे, ज्योती राजापुरे, अश्विनी ढोले, कल्याणी वाघमारे यांच्या अधिपत्याखाली महापालिका कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, मनपा कर्मचारी यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. या वेळी नवी सांगवीत 1, जुनी सांगवीत 7, दापोडीत 9 स्टॉल धारकांचे पत्रा शेड काढण्यात आले.

फटाके स्फोटक पदार्थ असल्यामुळे, तसेच कायदा सुव्यवस्था सुरळीतपणे रहावी. गर्दीच्या ठिकाणी पदपथावर, भर चौकात, रस्त्यावर अनधिकृतरीत्या स्टॉल उभारण्यास बंदी आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

उमेश ढाकणे,क्षेत्रीय अधिकारी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news