पिंपरी : गुंठेवारीसाठी अर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

पिंपरी : गुंठेवारीसाठी अर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे अर्ज करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.4) केले.

शहरातील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी अधिनियम पारीत केला आहे. त्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी 20 डिसेंबर 2021 पासून अर्ज स्वीकारले जात आहेत.

अर्ज स्विकृतीची मुदतवाढ 20 एप्रिलला संपली आहे. ती आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

https://youtu.be/uRpprmHUGnM

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news