पिंपरीत बीआरटीएस मार्गात वाहनचालकांची सर्रास घुसखोरी

पिंपरीत बीआरटीएस मार्गात वाहनचालकांची सर्रास घुसखोरी

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएमएल बसेससाठी बीआरटीएसचा वेगळा मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहने घुसखोरी करताना दिसून येत आहे. त्यामुळे बीआरटीएस बसेसला त्याचा अडथळा होत आहे. पर्यायाने, अपघाताला निमंत्रण ठरू शकते. शहरामध्ये बीआरटीएसचे निगडी ते दापोडी, किवळे ते सांगवी फाटा, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस रस्ता असे विविध मार्ग आहेत. या मार्गांवर दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र सेवा रस्ते आहेत. तरीही, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक या मार्गावर सर्रास वाहने घालत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

शॉर्टकट ठरू शकतो जीवघेणा

पीएमपीएमएल बससेवेसाठी असलेल्या बीआरटीएस कॉरिडॉरमधून बसचालक वेगाने बस चालवितात. या बीआरटीएस मार्गातून जलद गतीने जाता येईल, यासाठी वाहनचालक 'शॉर्टकट' म्हणून वाहने दामटतात. मात्र पाठीमागून वेगात बस आल्यास येथे अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी, नागरिक या बीआरटीएस मार्गातून दुभाजकावर चढून बस थांब्यावर जातात. ही बाब जीवघेणी ठरू शकते.

नागरिक व वाहनचालकांनी पीएमपीएमएल बससाठी असणार्‍या बीआरटीएस मार्गाचा वापर करू नये. खासगी वाहनांसाठी असलेल्या मार्गाचा वापर करावा. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी, मोरवाडी येथे बीआरटीएस मार्गातून वाहने नेणार्‍या वाहनचालकांचे प्रमाण कमी झाले आहे.

– अर्जून पवार, वाहतूक पोलिस.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news