pimpri chinchwad election : शरद पवारांचे लक्ष; भाजप होणार ‘लक्ष्य’ ?

pimpri chinchwad election : शरद पवारांचे लक्ष; भाजप होणार ‘लक्ष्य’ ?
Published on
Updated on

pimpri chinchwad election : साहेब, तुम्हीच आता पिंपरीत लक्ष घाला… अशी गळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी शरद पवार यांना घातली आणि ती मान्य करीत पिंपरीत मेळावा घेण्याचे पवार यांनी मान्य केले. यामुळे बळ आलेल्या राष्ट्रवादीने गतवेळचा वचपा काढत सत्ताधार्‍यांची शिकार करण्याचे नियोजन सुरू केल्याने भाजपला महापालिका निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात निर्विवाद वर्चस्व असणार्‍या राष्ट्रवादीला गतवेळच्या निवडणुकीत चित करणारा भाजप पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
पक्ष संघटन आणि बुथस्तरावर बैठका सुरु आहेत. त्रिसदस्यीय प्रभागरचना पथ्यावर पडल्याचे पक्षाच्या गोटात बोलले जात आहे.

pimpri chinchwad election : शरद पवार यांच्या रुपाने मोठे आव्हान

मतदारांसमोर कोणता अजेंडा घेऊन जायचे, याची व्यूहरचना आखली जात आहे. मुंबईतील नेत्यांनी अंतर्गत चाचपणी करण्यास सुरुवात
केली आहे. महापालिका ताब्यात असल्याने ऐनवेळी मतदारांना आकर्षित करणारे निर्णय घेण्याचे पारंपरिक फंडेही अवलंबले जाणार आहेत; मात्र या सगळ्या प्रयत्नांसमोर शरद पवार यांच्या रुपाने मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मोदी लाट असताना आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही शरद पवार यांनी विधानसभेची निवडणूक एकहाती फिरविली होती. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घालून तीच किमया ते अगदी सहजपणे येथे घडवून आणतील, असा राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना
विश्‍वास आहे.

त्यामुळेच त्यांनी मुंबईत पवार यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवडसाठी pimpri chinchwad election पुढाकार घेण्याची गळ घातली. त्यानंतर याच महिन्यात 13 रोजी बैठक आणि लगेच 16 रोजी पक्षाचा मेळावा घेण्याचे निश्‍चित झाले आहे.

पवार यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे. चर्‍होली येथे मेळावा घेऊन पक्षाने वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीकडून होणार्‍या भष्ट्राचाराच्या मुद्यावर सत्तेवर येऊन याच मुद्यावर अडचणीत आलेल्या भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. भाजपचे काही नगरसेवक पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे अनेक नगसेवक संपर्कात असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी उघडपणे सांगितले आहे. आत्ताच पक्षांतर
केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल आणि निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे ते बांधावर असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले होते.

निवडून येण्याची क्षमता असणार्‍यांना राष्ट्रवादीत प्रवेश देणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. या सगळ्याच्या पार्श्‍वभूमीवर
शरद पवार यांचाही सहभाग भाजपला अडचणीचा ठरणार, हे स्पष्ट आहे.

pimpri chinchwad election : शरद पवार की अजित पवार?

माझ्याच नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक होणार असल्याचे अजित पवार यांनी यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. यानंतर पक्षाचे पदाधिकारी शरद पवार यांना भेटले. पक्षाला अधिक बळ मिळावे, हा या भेटीमागचा हेतू आहे, असे पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे; मात्र यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता. अप्रत्यक्षपणे त्यांनी तो बालूनही दाखविला होता.

महापालिका जिंकण्यासाठी ते सक्रिय झाले असतानाच शरद पवार यांनीही लक्ष घातल्याने यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे; मात्र याचे उत्तर पक्षाच्या मेळाव्यानंतर मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी आयटी पार्क आणि उद्योगनगरी नावारूपास आणल्यानंतर खर्‍या अर्थाने पिंपरी-चिंचवडचा विकास झाला. गेल्या काही वर्षांत अजित पवार यांनी येथे केलेल्या विकासाकामांवर भाजपने पाणी फिरविले. येथे लक्ष देण्याचे आश्‍वासन शरद पवार यांनी दिल्यामुळे आम्हाला खर्‍या अर्थाने बळ मिळाले आहे.

– विलास लांडे, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

pimpri chinchwad election : पालिकेतील सध्याचे बलाबल

  • भाजप 77
  • राष्ट्रवादी 36

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news