Pimparkhed Road Work Delay: 418 कोटींच्या रस्त्याला ‘ग्रहण’; अवसरी-पिंपरखेड मार्गावरील संथ कामामुळे संताप

मार्गावरील संथगती कामामुळे नागरिक त्रस्त; पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वाची मागणी
Pimparkhed Road Work Delay
Pimparkhed Road Work DelayPudhari
Published on
Updated on

पिंपरखेड: अवसरी-पिंपरखेड-टाकळी हाजीमार्गे शिक्रापूर या 418 कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते पायाभूत सुविधा मंडळाच्या या प्रकल्पाला ठेकेदाराची मनमानी आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे ‌’ग््राहण‌’ लागले असून, पावसाळा तोंडावर आल्याने ग््राामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.

Pimparkhed Road Work Delay
Daund Bhima Sugar Factory Election: भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीवरून कुल–थोरात संघर्ष पुन्हा पेटणार

पिंपरखेड-काठापूर हद्दीवरील ओढ्यावर पुलाचे काम करण्यासाठी रस्ता खोदून आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. ओढा कोरडा असतानाही ठेकेदाराने पुलाचे काम सुरू केलेले नाही. परिणामी, शेतमाल वाहतूक करणारी वाहने आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून पर्यायी मार्गावरून कसरत करावी लागत आहे. आता पुन्हा पावसाळा जवळ आल्याने तोच नरकवास वाट्याला येणार का? असा सवाल ग््राामस्थ विचारत आहेत.

Pimparkhed Road Work Delay
Ambegaon Electric Shock: आंबेगावमध्ये विजेच्या तुटलेल्या तारेचा शॉक; धनगर मेंढपाळ महिलेचा दुर्दैवी मृत्यू

जांबुत-काठापूरदरम्यान रस्ता अनेक ठिकाणी अर्धवट आहे. सिमेंट रस्त्याच्या कडेला साइडपट्‌‍ट्या भरल्या नसल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. तसेच, पाणी न मारल्यामुळे उडणाऱ्या धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Pimparkhed Road Work Delay
Jejuri Toll Demand: जेजुरीत टोल माफीची जोरदार मागणी

शिंगवे हद्दीतही रस्ता उखडून ठेवल्याने प्रवासाची दैना झाली आहे. गेल्या पावसाळ्यात नागरिकांना या अर्धवट कामामुळे प्रचंड हाल सोसावे लागले होते. तब्बल 418 कोटी रुपये मंजूर असूनही जर वर्षभर एक पूल उभा राहू शकत नसेल, तर या निधीचा उपयोग काय? संबंधित अधिकारी ठेकेदाराच्या मनमानीला पाठीशी घालत असल्याचे आरोप ग््राामस्थांकडून होत आहेत.

Pimparkhed Road Work Delay
Usha Jagadale: दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन

अधिकाऱ्यांचे ठेकेदाराला अभय?

इतक्या मोठ्या निधीचा प्रकल्प असूनही ठेकेदारावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग््राामस्थ करीत आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम युद्धपातळीवर पूर्ण न झाल्यास पुन्हा ‌’नरकवास‌’ सोसावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news